Sunburn 2024 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa 2024: सनबर्नला हायकोर्टाचा ग्रीन सिग्नल, अटी- शर्ती लागू

Sunburn Festival Goa 2024: ॲड जनरल देविदास पांगम यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारचे निर्देश आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांसह सनबर्नला परवानगी दिली गेली आहे.

Akshata Chhatre

पेडणे: गोव्यातील प्रसिद्ध सनबर्न संगीत महोत्सवाला उच्च न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गोव्यात सनबर्न होणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम होतं, काही दिवसांपूर्वी धारगळमध्ये होणाऱ्या सनबर्न महोत्सवाबाबत दोन मतप्रवाह असताना गोवा पर्यटन खात्याने महोत्सवाला तत्वत: मान्यता होती. ॲड जनरल देविदास पांगम यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सरकारचे निर्देश आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांसह सनबर्नला परवानगी दिली गेली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना ॲड जनरल देविदास पांगम म्हणालेत की उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे गोव्यात सनबर्न यंदा देखील होईल. दरम्यान वाढणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची तसेच संगीत महोत्सवामुळे ध्वनी प्रदूषण होऊ नये याची जबाबदारी राज्य सरकारच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

सनबर्नच्या ठिकाणी काही अधिकारी उपस्थित असणार आहेत आणि ते संपूर्ण महोत्सवावर करडी नजर ठेवतील, याचप्रमाणे वाहतूक पोलीस वाहतूक आटोक्यात ठेवण्यासाठी तैनाद केले जाणार आहेत. सनबर्नच्या आयोजकांनी कार्यक्रमच्यावेळी कोणतीही चूक घडणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि सरकारकडून ठरवण्यात आलेल्या निर्देशांचं पालन करणं त्यांच्यासाठी अनिवार्य असेल. अशाप्रकारे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर कोर्ट पुन्हा एकदा सनबर्नचा विचार करेल आणि पुढचा निर्णय घेतला जाईल.

३१ डिसेंबर वगळता २८ ते ३० डिसेंबर रोजी धारगळ येथेच सनबर्न होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वी दक्षिण गोव्यात सनबर्न होणार याबाबत गेल्या सहा महिन्यांपासून चर्चा सुरु होती. सनबर्न आयोजकांनी देखील याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर महोत्सव धारगळमध्ये होईल, अशी माहिती समोर आली अन् त्याला विरोध सुरु झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT