Sunburn Goa: गोव्यात सनबर्नला विरोध करणाऱ्या आमदाराचा युटर्न; आता म्हणे, असे संगीत महोत्सव झाले पाहिजे

Jit Arolkar on Goa Sunburn: मांद्रे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी अचानक सनबर्न विषयीचे मत बदलले आहे
Jit Arolkar on Goa Sunburn: मांद्रे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी अचानक सनबर्न विषयीचे मत बदलले आहे
Jit Arolkar on Goa SunburnDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: यंदाच्यावर्षी धारगळ येथे होणाऱ्या सनबर्न या संगीत महोत्सवाला परवानगी मिळाली असली तरीही स्थानिकांना हा निर्णय पटलेला नाही. वारंवार स्थानिकांकडून सनबर्नला विरोध केला जातोय, यामध्ये काही आमदार तसेच मंत्री देखील त्यांची मतं नोंदवतायत. मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी देखील काही दिवसांपूर्वी सनबर्नला विरोध केला होता, मात्र आता अचानक आरोलकरांनी त्यांचं मत बदललं असून ते सनबर्नच्या वतीने बोलताना दिसले.

सनबर्न गोव्यात नको असं म्हणणारे जीत आरोलकर आता सनबर्न व्हावा अशी इच्छा व्यक्त करतायत. जीत आरोलकरांच्या म्हणण्याप्रमाणे गोवा हे एक पर्यटनस्थळ आहे आणि गोव्यात अधिकाधिक पर्यटक यायचे असतील तर असे संगीत महोत्सव झालेच पाहिजेत.

Jit Arolkar on Goa Sunburn: मांद्रे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी अचानक सनबर्न विषयीचे मत बदलले आहे
Sunburn in Goa: 5 विरुद्ध 4 गणितात 'सनबर्न विजयी'; पंचायतीच्या निर्णयानंतर आता विशेष ग्रामसभा भरवण्याची मागणी

"हे कार्यक्रम कुठे व्हावेत हा निर्णय राज्य सरकारचा आहे. मांद्रे येथे काही सनबर्न होणार नाही" असं म्हणत जीत आरोलकर यांनी या विषयावर आणखी बोलण्यात रस दाखवला नाही.

साधारण वर्षभरापूर्वी जीत आरोलकर स्वतः पेडण्यात सनबर्न नको म्हणून भूमिका मांडत होते. पेडणे ही कलाकारांची भूमी असल्याने सनबर्न सारखा कार्यक्रम हा त्यांच्यावर होणार अन्याय असल्याचं जीत म्हणाले होते. सनबर्न पेडण्यात नकोच असं स्पष्ट मत मांडणारे जीत आरोलकर अचानक मत बदलत असल्याने याबद्दल अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com