Colva : कोलवा पंचायतीने दिलेल्या मुदतीत दुसऱ्यांदा कचरा विल्हेवाट सुविधा (एमआरएफ) उभी न केल्याने गोवा खंडपीठाने आज कोलवाच्या सरपंचांना चांगले धारेवर धरले. खंडपीठाने सरपंचाविरोधात कोणती कारवाई करता येईल, याची माहिती पंचायत संचालकांना देण्याचे निर्देश देत सुनावणी 31 जानेवारीला ठेवली आहे. कचरा विल्हेवाट सुविधा उभी करण्यासाठी पंचायतीने जमा केलेली 90 हजारांची रक्कमही कोर्टाने जप्त केली आहे.
गोवा खंडपीठात कचरा विल्हेवाट सुविधा उभी करण्यासंदर्भातची स्वेच्छा जनहित याचिकेवरील सुनावणी सुरू आहे. खंडपीठाने राज्यातील पंचायतींना ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी वारंवार निर्देश दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नसल्याबद्दल खंडपीठाने संताप व्यक्त केला. खंडपीठाने कोलवा पंचायतीला वारंवार कचरा विल्हेवाट सुविधा उभी करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ दिली.
अनेकदा संधी देऊनही यंत्रणा उभी करण्यासाठी कोणतीच पावले उचलत नाहीत व फक वेळेवेळी कारणे दिली जात असल्याबद्दल कानउघाडणी केली. पंचायतीकडून दोन वेळा ही सुविधा उभी करण्यासाठी रक्कम जमा करण्यास लावली. मात्र, त्याचा काहीच परिणाम होत नसल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आता सरपंचावरच ठोस कारवाई करण्याचा खंडपीठाने ठरवले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.