Bombay High Court At Goa  Dainik Gomantak
गोवा

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Goa Court: 16 फेब्रुवारी 2021 रोजी तक्रार दाखल केली असली तरी ही घटना खूप आधी घडली होती, याचा बाल न्यायालयाने विचार केला नसल्याचे HC म्हटले आहे.

Pramod Yadav

Bombay High Court At Goa

पणजी: मुलीवरील लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपातून संशयित पित्याची निर्दोष मुक्तता केल्याचा बाल न्यायालयाचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केला आहे. गोवा बाल कायद्यांतर्गत कथित घटनेच्या दिवशी मुलगी अल्पवयीन नव्हती, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पित्याला निर्दोष ठरवले होते.

गोवा बाल अधिनियमाच्या कलम 8(2) सोबतच, आरोपीवर POCSO कायद्याच्या कलम 4, 5, 6, 8, 9, 10, 11 आणि 12 अंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कथित घटनेच्या तारखेला, म्हणजेच 14.02.2021 रोजी पीडितेचे वय 16 वर्षे आणि 4 महिने असल्याच्या कारणावरून बाल न्यायालयाने पित्याची निर्दोष मुक्तता केली होती.

दरम्यान, 16.02.2021 रोजी तक्रार दाखल केली असली तरी ही घटना खूप आधी घडली होती. पीडितेच्या माहितीनुसार, आरोपीने हे कृत्य पीडित मुलगी सातवीत असताना आणि 14.02.2021 च्या एक वर्ष आधी सुरू केली, असे राज्याच्या वकिलांनी कोर्टात सांगितले.

न्यायालयाने याची दखल घेत बाल न्यायालयाने पीडितेचे म्हणणे विचारात घेतले नाही, असे असे निरीक्षण नोंदवले.

बाल न्यायालयाचा आदेश असे दर्शवितो की ट्रायल कोर्टाने केवळ 14.02.2021 रोजी घडलेल्या कथित घटनेचा विचार केला आणि 14.02.2021 पूर्वी सुमारे एक वर्षाच्या कालावधीत आरोपींनी केलेल्या आरोपांबाबत पीडितेच्या विधानाचा विचार केलेला नाही.

ट्रायल कोर्ट अशा पैलूंवर विचार करण्यात अयशस्वी ठरले. उच्च न्यायालयाने बाल न्यायालयाचा आदेश चुकीचा आणि विपर्यास असल्याचे म्हणत तो आदेश रद्द केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT