Goa Youth Arrested For Bomb Threat in Maharashtra 
गोवा

Bomb Threat : गोव्यातील तरुणाकडून मुंबईत बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी; मुंबई-गोवा पोलीस सतर्क

मुंबई पोलिसांनी हा मेसेज पाठवणाऱ्याचा त्वरीत शोध घेतला आणि गोव्यातून त्या व्यक्तीला अटकही करण्यात आली

Kavya Powar

Bomb Threat Maharashtra: गोव्यातील एका मद्यधुंद तरुणाने संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देऊन दहशत निर्माण केली. यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली. मात्र, काही तासांतच त्याला अटक करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

संपूर्ण प्रकरण असे की...

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी गाड्यांना गर्दी असते. त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी सकाळी 9 च्या सुमारास स्टेशनवर बॉम्बस्फोट घडवून आपण सर्व फोन बंद करून टाकूयात आणि त्यानंतर एका ठिकाणी भेटूया... अशा स्वरूपाचा एक संदेश गोव्यातील एका व्यक्तीने मुंबईत राहणाऱ्या एका तरुणाला केला होता.

हा संदेश मिळताच तरुणाने तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली. तिथून हे प्रकरण वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आणि सारी पोलीस यंत्रणा कामाला लागली.

यानंतर राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांना हाय अलर्ट जारी करण्यात आले आणि तपासाला सुरुवात झाली. मेसेज पाठवणारा उत्तर गोव्यात राहत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळताच त्यांनी शुक्रवारी त्याला गोव्यातून ताब्यात घेतले.

(Goa Youth Arrested For Bomb Threat in Maharashtra)

पोलीस यंत्रणेचे धाबे दणाणले...

या मेसेजनंतर संबंधित स्थानकांवर पोलीस बंदोबस्त, बॉम्बशोधक पथक, श्वानपथक तैनात करण्यात आले आणि तपासणी करण्यात आली.

शेवटी पोलिसांनी मोबाईलच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला आणि गोव्यातून त्याला ताब्यात घेतले. त्याने मद्यधुंद अवस्थेत हा मजकूर पाठवला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पोलिस याबाबत अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT