Tollywood Choreographer Jani Master Arrested 
गोवा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Jani Master Arrested: पीडित मुलीने तब्बल ४० पानांची लेखी तक्रार पोलिसांत दाखल केली असून, २०१९ सालांपासूनच्या विविध घटनांचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.

Pramod Yadav

Tollywood Choreographer Jani Master Arrested

पणजी: बॉलीवूड आणि टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यातून अटक करण्यात आलीय. जानीवर त्याच्या नृत्य सहकाऱ्याचा सहा वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सायबराबाद पोलिसांनी गुरुवारी (१९ सप्टेंबर) ही कारवाई केली.

२१ वर्षीय मुलीने याबाबत सायबराबाद पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी ही कारवाई करण्यात आली. २०१९ सालापासून मास्टर जानी लैंगिक अत्याचार करत असल्याची तक्रार पीडित मुलीने पोलिसांत दिली आहे.

तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शेख जानी बाशा उर्फ मास्टर जानी याला गोव्यातून अटक केली. पीडित मुलीने तब्बल ४० पानांची लेखी तक्रार पोलिसांत दाखल केली असून, २०१९ सालांपासूनच्या विविध घटनांचा उल्लेख त्यात करण्यात आला आहे.

संशयित जानीने पीडित मुलीवर आऊटडोअर शुटींग दरम्यान वेळोवेळी अत्याचार केले तसेच, याबाबत कोणाकडे तक्रार केल्यास फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर हकालपट्टी करण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

पोलिसांनी जानी विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद केला असून, त्याला हैद्राबादला हलविण्यात आले आहे. उद्या म्हणजेच २० स्पटेंबर रोजी त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पीडित मुलगी १६ वर्षाची असल्यापासून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.

तेलंगणा महिला आयोगाने देखील पीडित मुलीच्या तक्रारीची गंभीर दखल घेतली असून, तिला सुरक्षा पुरविण्याबाबत सूचना करण्यात आलीय.

दरम्यान, बॉलीवूड आणि टॉलीवूडमध्ये मास्टर जानी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या या नृत्य दिग्दर्शकाने दिग्गज रजनीकांत, थालापती विजय, विजय देवरकोंडा, अल्लू अर्जून, सलमान खान, अक्षय कुमार, सारा अली खान, प्रभूदेवा, शाहिद कपूर, राम चरण तसेच चिरंजीवी यासारख्या अभिनेत्यांसोबत काम केले आहे. अलिकडेच आलेल्या स्री -२ मध्ये देखील त्यांना राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्यासोबत काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Market: '..तर पालिकेसमोर मासे विकू'! वास्कोतील विक्रेत्यांचा पवित्रा; अन्यत्र मासळी विक्री बंदी, सायबिणीच्या स्थापनेची मागणी

Goa coastal survey: गोवा मुक्तीनंतरचे सर्वात मोठे सर्वेक्षण! किनारी भागांत धास्ती; बेकायदा बांधकामांवर होणार कारवाई

GCA: अखेर विषय संपला! रोहन गावस देसाईच ‘जीसीए’चे प्रतिनिधी; BCCI निवडणुकीसाठी शिक्कामोर्तब

Arambol: वृक्षतोड नाही, झाडी कापली! वन खात्याचा हास्यास्पद दावा; हरमलमध्ये संतापाची लाट

Goa Crime: बनावट ग्राहक पाठवला, सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; मास्टरमाईंडला बेळगाव येथून अटक

SCROLL FOR NEXT