Sushmita Sen About Goa 
गोवा

Sushmita Sen About Goa: आय लव्ह गोवा! सुश्‍मिता सेन म्हणते 'गोवा इज ॲन इमोशन'

Sushmita Sen About Goa: ‘माझे घर आणि गोवा ही माझ्यासाठी सर्वात प्रिय ठिकाणे आहेत…. आय लव्ह गोवा.’

गोमन्तक डिजिटल टीम

Sushmita Sen About Goa

इन्स्टाग्रामवर ‘कर्ली टेल्स’ हा एक ग्रुप आहे, ज्यावर भारतातील उत्कृष्ट खाद्यप्रकार आणि पर्यटनस्थळे याबद्दल आपल्याला माहिती आणि सल्ला मिळू शकते. इन्स्टाग्रामवर या ग्रुपच्या संस्थापक आणि मुख्य संपादिका कामिया जानी जीवनशैलीच्या संदर्भात अनेक सेलिब्रिटींकडे बातचित करताना दिसते.

काही दिवसांपूर्वी तिने हॉलिवूड तारका आणि विश्र्वसुुंदरी सुश्‍मिता सेन यांच्याबराेबरच्या मुलाखतीच्या व्हिडिओ क्लिप इन्टाग्रामवर टाकल्या आहेत. या मुलाखतीत ती सुश्‍मिता सेनला तिच्या आवडत्या पर्यटनस्थळांबद्दल विचारताना दिसते.

सुश्‍मिता सेन तिला उत्तर देताना तिला आवडणाऱ्या जगातील विविध देशांबद्दल बोलताना दिसते तसेच भारतातील केरळ, राजस्थान या राज्यांचा उल्लेखही ती करते पण जेव्हा सुश्‍मिता गोव्याबद्दल बोलायला लागते तेव्हा तिचे डोळे अधिकच चमकतात. ती म्हणते, ‘माझे घर आणि गोवा ही माझ्यासाठी सर्वात प्रिय ठिकाणे आहेत…. आय लव्ह गोवा.’

या व्हिडिओ क्लिपमध्ये, सुश्‍मिता कामियाला हेदेखील सांगताना दिसते की तिला ड्रायव्हिंग करायला खूप आवडते. मुंबईवरुन गोव्याला येताना, ६०० किलोमीटरचे हे अंतर ती गाडी चालवत पार करते. जेव्हा चार पाच दिवस ती शूटपासून माेकळी असते तेव्हा ती आपल्या मुलांना उठवते, त्यांना गाडीत बसवते आणि गोव्याच्या दिशेने प्रवास करायला सुुरुवात करते.

सुश्‍मिता गोव्याला गाडी चालवत जाते याचे कामियाला आश्‍चर्यही वाटते आणि अप्रुपही दिसते. सुश्‍मिताशी बोलताना कामियाला हे सांगितल्यावाचून रहावत नाही की, एखाद्यावेळी तिलादेखील सुश्‍मिताबरोबर गाडीत बसूून गाेव्याला यायला आवडेल. सुश्‍मिता आनंदाने तिला गोव्यात आपल्याबरोबर यायचे निमंत्रण देते.

ती म्हणते, ‘मात्र गाडी मी चालवेन. प्रवासात गाडीत वाजणाऱ्या गाण्यांची यादीदेखील मी निवडेन. इतकेच नव्हे तर गाडीचे मूनरूफ (गाडीच्या वरच्या भागात असलेली पारदर्शक काच, जिला सनरूफ देखील म्हटले जाते) मी उघडे ठेवीन. तू डोके वर काढायचे आणि पश्‍चिम घाटाच्या सौंदर्याचा आनंद घ्यायचा.

कामियासाठी हे ललचावणारे निमंत्रण असते. ती आपल्या या पोस्टवर स्वतः एक कॉमेंट करते. त्यात ती म्हणते, ‘गोवा इज नॉट जस्ट अ प्लेस बट ॲन इमोशन.’.. सुश्‍मिता सेनच्या भावनांना तिने अचूक ओळखलेले असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT