Malaika Arora Goa Vacation Dainik Gomantak
गोवा

Malaika Arora Goa Vacation: फॅशनका है ये जलवा! मलायकाचा लालपरी लूक, गोवा व्हेकेशनचे फोटो आले समोर

Malaika Arora Vacation Look: अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या गोवा ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील तिचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

Manish Jadhav

Malaika Arora In Goa:बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री मलायका अरोरा 51 वर्षांची असली तरी तिची स्टाईल आणि फिटनेस अजूनही 25 वर्षांच्या अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. ती तिच्या इंस्टाग्रामवर सतत वेगवेगळ्या प्रकारचे फोटो शेअर करते, ज्यामध्ये तिचा बोल्डनेस आणि सुंदर स्टाईल दिसते. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्रामवर तिच्या गोवा ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत. यातील तिचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

मलायकाची स्टाईल मोहिनी घालते!

गोवा (Goa) ट्रिप दरम्यान मलायकाने सुंदर लाल सॅटिन ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. स्पॅगेटी स्ट्रॅप्स आणि डीप व्ही-नेकलाइन असलेला हा ड्रेस झुमेल अँड कंपनी ब्रँडचा आहे. हा ड्रेस मलायकाच्या फिगरला आणखीनच सूट करतो. सॅटिन फॅब्रिकपासून बनवलेल्या या ड्रेसच्या फिटिंग आणि फ्लोई स्कर्टमध्ये तिचा लूक खूपच घायाळ करणारा दिसत आहे.

बॅकलेस डिझाइन

मलायकाच्या ड्रेसची खास गोष्ट म्हणजे त्याची बॅकलेस डिझाइन. त्यावर मागून पातळ स्ट्रॅप्स क्रॉसवाईज बांधलेले आहेत, ज्यामुळे ड्रेसचा लूक आणखी स्टायलिश दिसत आहे. ड्रेसची किंमत सुमारे 14000 रुपये असल्याचे सांगितले जाते. जर तुम्हालाही मलायकाचा हा लूक आणि ड्रेस आवडत असेल तर तुम्हाला 14 हजार रुपये मोजावे लागतील. मलायकाचे क्लासिस फोटो चाहत्यांना मोहित करत आहेत.

मिनिमल दागिन्यांसह स्टायलिश बनवले

मलायकाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी कोणतेही दागिने घातले नाहीत. तिने केवळ काही अंगठ्या घातल्या आहेत. तिचा मेकअपशिवाय लूक आणि केसांचा अंबाडा चाहत्यांना आकर्षित करतो. याशिवाय, मलायका अनेक वेगळ्या लूकमध्ये दिसली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT