पणजी: बॉलिवूडची 'दंगल गर्ल' फातिमा सना शेख हिने 2026 या नवीन वर्षाचे स्वागत अत्यंत साहसी पद्धतीने केले. गोव्यातील धबधब्याच्या एका उंच कड्यावरुन उडी मारत (Cliff Diving) तिने आपल्यातील भीतीवर विजय मिळवला. या थरारक अनुभवाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला.
कड्यावरुन उडी मारणे दिसायला जितके सोपे वाटते, तितके ते प्रत्यक्षात नसते, असे फातिमा सांगते. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओसोबत तिने आपला अनुभव प्रांजळपणे मांडला. फातिमा म्हणाली की, कड्याच्या टोकावर उभं राहिल्यानंतर तिला प्रचंड भीती वाटत होती. तब्बल 20 मिनिटे ती तिथेच उभी होती आणि स्वतःच्या मनाशी संघर्ष करत होती. सरतेशेवटी सर्व भीती बाजूला सारुन तिने झोकून दिले. एकदा उडी मारल्यानंतर मात्र तिची भीती पूर्णपणे पळाली आणि तिने पुन्हा एकदा नव्हे, तर तब्बल चार वेळा हा डायव्ह पूर्ण केला.
फातिमाच्या मते, खरी भीती ही उडी मारण्याची नव्हती, तर उडी मारण्यापूर्वी मनात तयार होणाऱ्या विचारांची होती. "हवेत असतानाचे ते काही सेकंद खूप मोठे वाटत होते. भीतीचे रुपांतर एड्रेनालाईनमध्ये (Adrenaline) होतानाचा अनुभव विस्मयकारक होता," असे तिने कॅप्शनमध्ये नमूद केले. कड्यावरुन मारलेली ही उडी केवळ शारीरिक साहस नव्हते, तर ते मानसिक विजयाचे प्रतीक होते, अशी भावना तिने व्यक्त केली.
फातिमा सध्या गोव्यामध्ये (Goa) नवीन वर्षाच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. क्लिफ डायव्हिंग व्यतिरिक्त तिने तिच्या ट्रिपचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत. यात समुद्राच्या लाटांचा आनंद घेतानाचे क्षण, आपल्या पाळीव कुत्र्यासोबत घालवलेली सायंकाळ, मांजरीसोबतचे खेळ आणि कॉफी पितानाचे निवांत क्षण पाहायला मिळत आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लाईक केले जात आहेत.
फातिमा सना शेखने आपल्या करिअरची सुरुवात 'चाची 420' मध्ये बालकलाकार म्हणून केली होती. मात्र, आमिर खानच्या 'दंगल' चित्रपटातील गीता फोगटच्या भूमिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने 'लूडो', 'थार' आणि 'सॅम बहादूर' यांसारख्या चित्रपटांत आपल्या अभिनयाने छाप पाडली. सध्या ती 'मेट्रो... इन दिनों' आणि 'गुस्ताख इश्क' यांसारख्या आगामी प्रोजेक्ट्समुळे चर्चेत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.