
क्रिकेटचा देव मानला जाणारा सचिन तेंडुलकर याचा मुलगा आणि युवा क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर नुकताच साखरपुड्यामुळे चर्चेत आला होता. त्याचे लग्न ठरल्याची बातमी समोर आल्यानंतर कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. दरम्यान आता सचिनची लेक सारा तेंडुलकरही सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे.
सारा नेहमीप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या लाखो चाहत्यांना तिच्या पोस्ट्सची उत्सुकता असते. नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले असून ते गोव्यातील असल्याचं सांगितलं जात आहे.
या फोटोंमध्ये सारा एका तरुणासोबत दिसत आहे. नैसर्गिकच, चाहत्यांमध्ये प्रश्न उपस्थित झाला की हा तरुण नेमका कोण? आणि सारा तेंडुलकरच्या आयुष्यात नवीन व्यक्ती आली आहे का?
समोर आलेल्या माहितीनुसार, त्या तरुणाचे नाव सिद्धार्थ केरकर आहे. सोशल मीडियावर त्याचं वर्णन बिझनेसमन म्हणून केले जात असले तरी, त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवरून तो एक कलाकार असल्याचं दिसून येतं. त्यामुळे सिद्धार्थच्या प्रोफाइलबद्दल जितकं संभ्रम आहे, तितकाच संभ्रम त्याच्या आणि साराच्या नातेसंबंधांबद्दल चाहत्यांमध्ये पसरला आहे.
सिद्धार्थ आणि सारा यांची ओळख अनेक वर्षांपासून आहे, मात्र त्यांच्या एकत्रित फोटोंचा फारसा उल्लेख कधी झाला नव्हता. पण या नवीन फोटोंनंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी विविध चर्चा सुरू केल्या. अनेकांनी सारा आणि सिद्धार्थ रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला.
मात्र, या चर्चेला साऱ्यानेच पूर्णविराम दिला आहे. त्या फोटोंखाली केलेल्या कमेंटमध्ये तिने “थँक यू बेस्टी...” असे लिहिले आहे. तिच्या या प्रतिक्रियेनंतर सिद्धार्थ हा तिचा फक्त जवळचा मित्र असल्याचं स्पष्ट झालं.
सध्या सारा तेंडुलकरचे फोटो, तिचं पर्सनल लाइफ आणि तिच्या सोशल मीडिया ॲक्टिव्हिटीमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे अर्जुनच्या साखरपुड्याच्या बातमीमुळे तेंडुलकर कुटुंब पुन्हा एकदा चर्चेत आलेलं दिसत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.