Salman Khan In IFFI Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Salman Khan In IFFI Goa 2023: लाडक्या भाचीसाठी सलमान खान अवतरला इफ्फीच्या रेड कार्पेटवर

सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सलमान रेड कार्पेटवर दाखल झाला.

Pramod Yadav

Salman Khan In IFFI Goa 2023: बॉलिवूड अभिनेता भाईजान सलमान खानने मंगळवारी इफ्फीच्या रेड कार्पेटवर ग्रॅन्ड एन्ट्री घेतली. गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस असून, सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सलमान रेड कार्पेटवर दाखल झाला.

सलमानच्या भाचीचा फर्रे हा चित्रपट इफ्फीत प्रदर्शित केला जाणार आहे. इंडियन पॅनोरमामध्ये समाविष्ट 25 फीचर आणि 20 नॉन-फिचर फिल्म्सची घोषणा करण्यात आली आहे.

या महोत्सवात सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्रीचा पहिला चित्रपट 'फर्रे' प्रदर्शित केला जाणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक सौमेंद्र पाधी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, अभिषेक यादव आणि पाधी यांनी चित्रपटाचे लिखाण केले आहे.

या चित्रपटात सलमानची भाची अलिजेहची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटासाठी आणि भाचीचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सलमान इफ्फीच्या रेड कार्पेटवर दाखल झाला.

फर्रे शैक्षणिक क्षेत्रातील फसवणूक आणि गुंतागुंत यात डोकावतो. नियती नावाच्या अनाथ विद्यार्थीनीला शिष्यवृत्ती मिळाली आहे मात्र, तिच्याच श्रीमंत मित्रांमुळे ती एका मोठ्या फसवणुकीच्या रॅकेटमध्ये अडकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT