Salman Khan IFFI Viral Video Dainik Gomantak
गोवा

Salman Khan IFFI Viral Video: इफ्फीच्या रेड कार्पेटवर सलमानने मैत्रिणीला मिठी मारली अन्..., व्हिडिओ व्हायरल

सलमानची भाची अलिझेह अग्निहोत्री 'फर्रे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

Pramod Yadav

Salman Khan IFFI Viral Video: गोव्यात 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) सुरू आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात मंगळवारी (21 नोव्हेंबर) सलमान खानने हजेरी लावली.

सलमानची भाची अलिझेह अग्निहोत्री 'फर्रे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सलमान इफ्फीत सहभागी झाला होता. रेड कार्पेटवर येताना सलमान एका महिला पत्रकाराला पाहताच पुढे येत तिला मिठी मारली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले.

सलमानचा 'टायगर 3' सध्या धुमाकूळ घालत आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये सलमानने 'फॅर्रे'च्या टीमसोबत छायाचित्रांसाठी पोझ दिली. यावेळी सलमान खान त्याच्या एका महिला पत्रकार मैत्रिणीला रेड कार्पेटवर पाहून खूश झाला.

सलमान पुढे येत त्याने तिला मिठी मारली आणि तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. दोघांमध्ये थट्टा मस्करी झाल्यानंतर सलमान पुढे निघून गेला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

'एक था टायगर', 'टायगर जिंदा है', 'वार' आणि 'पठाण' नंतर YRF चा 'टायगर 3' प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा एकदा अविनाश आणि झोयाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.

'टायगर 3' ची निर्मिती आदित्य चोप्राने केली आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांनी कॅमिओ केला आहे. चित्रपटाचे संगीत प्रीतमने केले असून, पार्श्वसंगीत तनुज टिकूने संगीतबद्ध केले आहे. 'टायगर 3' अंदाजे 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT