UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

Prakash Velip: दक्षिण गोवा निबंधकांनी प्रकाश वेळीप यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण समितीला पुढील आदेश येईपर्यंत उटा समिती म्हणून कार्यरत राहण्यास निर्बंध घातले आहेत.
UTAA, Prakash Velip
UTAA, Prakash VelipDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: ‘उटा’चे पदाधिकारी असलेले गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून काढून टाकल्यामुळे ‘उटा’ संघटनेला पहिला धक्का बसला होता. आता दक्षिण गोवा निबंधकांनी प्रकाश वेळीप यांच्या अध्यक्षतेखालील संपूर्ण समितीला पुढील आदेश येईपर्यंत उटा समिती म्हणून कार्यरत राहण्यास निर्बंध घातले आहेत.

उटा’ संघटनेची पुढील निवडणूक सप्टेंबर २०२५ मध्ये होणार असून तोपर्यंत ‘उटा’च्या विद्यमान कार्यकारिणीने कोणतीही सभा घेऊ नये वा आर्थिक व्यवहार करू नये, असे निबंधकांनी म्हटले आहे. दक्षिण गोवा जिल्हा निबंधक सूरज वेर्णेकर यांनी हा निर्णय दिला. यापुढील सुनावणी २३ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

प्रकाश वेळीप यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेली ‘उटा’ची समिती ही बेकायदेशीररित्या निवडण्यात आली असून त्यामुळे ती बरखास्त करावी आणि या समितीचा ताबा प्रशासकाकडे देण्यात यावा, अशी मागणी ‘उटा’च्या आठ सहयोगी संघटनांपैकी सहा संघटनांनी केली होती.

ही समिती निवडताना सहयोगी संघटनांमधील पदाधिकाऱ्यांना केंद्रीय समितीवर स्थान दिले नाही आणि एका सदस्याला सतत दोनपेक्षा अधिक वेळा कार्यकारिणीवर राहता येत नाही; पण वेळीप यांच्या अध्यक्षतेखालील समितीमधील सदस्य दोन टर्मपेक्षा अधिक काळ कार्यकारिणीवर आहेत, याला या संघटनांनी आक्षेप घेतला होता.

निवडणूक सप्टेंबरमध्ये

‘उटा’ या आदिवासी संघटनेची निवडणूक येत्या सप्टेंबर महिन्यात होणार आहे. मात्र, तोपर्यंत विद्यमान कार्यकारिणीने कोणतीही सभा घेऊ नये किंवा आर्थिक व्यवहारांची उलाढाल करू नये, असे आदेश दक्षिण गोवा जिल्हा निबंधकांनी दिले आहेत. याप्रश्‍नी सहा एसटी संघटनांनी याचिका दाखल केली होती.

...हा तर हुकूमशाहीचा अंत

आजचा निर्णय म्हणजे ‘उटा’ संघटनेतील हुकूमशाहीचा अंत, अशी प्रतिक्रिया याचिकादार गोविंद शिरोडकर यांनी व्यक्त केली. ‘उटा’ ही आठ संघटना एकत्र येऊन केलेली नाही तर ती वैयक्तिक सदस्यांनी सोसायटी असे म्हणणे, हा ‘उटा’साठी बलिदान दिलेल्या युवकांच्या कुटुंबीयांचा अपमान आहे. आज या हुकूमशाहीविरुद्ध उठविलेल्या आवाजाचा हा विजय आहे, अशी प्रतिक्रिया शिरोडकर यांनी व्यक्त केली.

ही वैयक्तिक सदस्यांनी केलेली सोसायटी

या याचिकेला आक्षेप घेताना प्रकाश वेळीप यांनी उटा ही संघटना आठ संघटनांनी मिळून तयार केलेली नाही, तर ती वैयक्तिक सदस्यांनी केलेली सोसायटी, असा दावा करून याचिकादारांना याचिका दाखल करण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे म्हटले होते.

UTAA, Prakash Velip
UTAA Dispute: 'उटा'ची बेकायदेशीर कार्यकारिणी बरखास्‍त करा! 6 संघटनांचा दावा; प्रकाश वेळीपांसह दोघांना नोटीस

याचिकादारांच्या मुद्द्यामध्ये तथ्य

प्रकाश वेळीप यांच्या अध्यक्षतेखालील समिती दोन टर्मपेक्षा अधिक काळ कार्यरत आहे, या याचिकादारांच्या मुद्द्यात प्रथमदर्शनी तथ्य आढळून आल्याने दक्षिण गोवा निबंधकांनी पुढील आदेश येईपर्यंत वेळीप यांच्या समितीला कार्य करण्यास निर्बंध घातले.

UTAA, Prakash Velip
UTAA: ‘उटा’ 8 संघटनांनी एकत्र येऊन स्‍थापलेली संस्‍था नव्‍हे! ती 14 व्यक्तींनी केलेली सोसायटी; प्रकाश वेळीप यांचा दावा

प्रकाश म्हणतात ‘नो कमेंट्स’

निकालासंबंधी प्रकाश वेळीप यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना फक्त ‘नो कमेंट्स’ असे सांगितले. विशेष म्हणजे, यापूर्वी गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटविले, तेव्हाही प्रकाश वेळीप यांनी अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com