Advalpal: अडवलपालमध्ये नळांद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा! स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; ‘फोमेंतो’मुळे समस्या उद्भवल्याचा संशय

Advalpal Contaminated Water: खाणव्याप्त अडवलपालमधील लोकांवर सध्या मातीमिश्रित गढूळ पाणी पिण्‍याची नामुष्की ओढवली असून, घरगुती नळांद्वारे चक्क दूषित (मातीमिश्रित) पाण्याचा पुरवठा होत आहे.
Advalpal Water Issue
Advalpal Water Problem Dainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : खाणव्याप्त अडवलपालमधील लोकांवर सध्या मातीमिश्रित गढूळ पाणी पिण्‍याची नामुष्की ओढवली असून, घरगुती नळांद्वारे चक्क दूषित (मातीमिश्रित) पाण्याचा पुरवठा होत आहे. परिसरात कार्यरत ‘फोमेंतो’च्या खाणीवरील खनिज गाळ (रिजेक्शन) पाण्‍यात मिसळत असल्यामुळे ही समस्या निर्माण झाली असावी, असा दावा माजी सरपंच प्रेमानंद साळगावकर, आनंद गाड यांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना केला आहे.

दूषित (गढूळ) पाण्यामुळे गावात रोगराई फैलावून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. तशी भीतीही स्थानिक नागरिकांसह गृहिणी व्यक्त करीत आहेत. गेल्या महिन्यापासून ही समस्या असून, त्‍याविषयी कळवून देखील पाणीपुरवठा खाते, तसेच इतर संबंधित यंत्रणा गंभीर नाही, असे अडवलपालवासीय सातत्‍याने सांगत आहेत.

दूषित पाण्याचे दुष्परिणाम जाणवण्याआधीच प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा अन्य संबंधित यंत्रणेने या पाण्याची तपासणी करून लोकांमधील भीती दूर करावी. लोकांना स्वच्छ आणि प्रदूषणविरहित पाणी पुरवण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी माजी सरपंच प्रेमानंद साळगावकर यांनी केली आहे.

म्हापसा शहरासह बार्देश तालुक्यालाही गढूळ पाण्याचा पुरवठा

शहरासह बार्देश तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गढूळ पाणीपुरवठा होत आहे. जनतेला स्वच्छ पेयजल पुरविण्यास राज्य सरकार पूर्णत: असफल ठरले आहे. शुद्ध पाणी न मिळाल्यामुळे राज्य सरकार स्वत:च रोगराईला आमंत्रण देत अाहे. बार्देश तालुक्यातील जनतेला येत्या आठवड्याभरात स्वच्छ आणि नियमित पाणी न मिळाल्यास पाणीपुरवठा खात्यासह उपसभापती जोशुआ डिसोझा यांच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढू, असा इशारा काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी दिला आहे.

Advalpal Water Issue
Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

पार्श्वभूमी काय आहे?

१ अडवलपाल गावाला खेटून असलेल्या अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पातून उत्तर गोव्यासह अडवलपाल गावाला पाणीपुरवठा होतो. अडवलपाल गावात कार्यरत असलेली ‘फोमेंतो’ची खाण जलशुद्धीकरण प्रकल्पापासून साधारण दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे.

२ अडवलपाल गावापासून उंचवट्यावर कोळंब गावाच्या माथ्यावर ही खाण असून, अडवलपालमधील खाणव्याप्त भागातून वाहणारे नाले-ओहोळ अस्नोडा येथील पार नदीला जोडले आहेत.

Advalpal Water Issue
Goa Water Crisis: गोवावासीयांसमोर भीषण पाणीसंकट! राज्यात 62 MLD पाण्याची तूट; तक्रारींचा वाढला ओघ

३ पावसाळ्यातील पाण्याबरोबर ‘फोमेंतो’ कंपनीच्या खाणीमधील खनिज माती नाल्यांमधून पार नदीत मिसळते. खनिज खंदकातील पाणी याच नाल्यांमधून बाहेर सोडण्यात येते. अडवलपाल गावाला दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असल्याचा दावा केला जात आहे.

४ खनिज ‘रिजेक्शन’ची पावडर आणि खनिज गाळ जलशुद्धीकरण प्रकल्पातील पाण्यात मिसळत असावा, असा कयास प्रेमानंद साळगावकर आणि आनंद गाड यांनी व्‍यक्‍त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com