Karthik Aaryan In Goa Dainik Gomantak
गोवा

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Kartik Aaryan Birthday: आपल्या अदाकारीने चाहत्यांच्या दिलावर अधिराज्य गाजववणारा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन शनिवारी (23 नोव्हेंबर) 34 वर्षांचा होणार आहे.

Manish Jadhav

आपल्या अदाकारीने चाहत्यांच्या दिलावर अधिराज्य गाजववणारा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन शनिवारी (23 नोव्हेंबर) 34 वर्षांचा होणार आहे. तत्पूर्वी, कार्तिक गोव्यातील निळाशार समुद्रकिनाऱ्यावर दिसला. 55 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलसाठी कार्तिक सध्या गोव्यात आला आहे. यावेळी त्याने समुद्रकिनाऱ्यावरील फोटो आपल्या इस्टांग्राम अकाऊंटवरुन शेअर केले. या फोटोंमध्ये कार्तिक समुद्रकिनाऱ्यावर मावळत्या सूर्याकडे पाहताना दिसतोय.

दरम्यान, गुरुवारी कार्तिकने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पोस्टवरुन काही फोटो पोस्ट केले. आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर त्याने समुद्रकिनाऱ्यावरुन एक ग्लासचा पोस्ट केला, ज्याच्या बॅग्राऊंडमध्ये एस्प्रेसो हे गाणे ऐकू येत आहे. तर पुढच्या स्टोरीमध्ये कार्तिक समुद्रकिनाऱ्यावर मावळत्या सूर्याला सलाम दुवा करताना दिसतोय. कार्तिकच्या या पोस्टवर प्रसिद्ध गायक सोनू निगमने प्रतिक्रिया दिली. त्याने कार्तिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अलीकडेच, कार्तिक गुजरातमध्ये (Gujarat) होता, जिथे त्याने अहमदाबादमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टला हजेरी लावली होती. त्यानंतर कार्तिकने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन दोघांचे फोटोही शेअर केले होते. पहिल्या फोटोत दिलजीत आणि कार्तिक ब्लॅक आऊटफीटमध्ये दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत कार्तिक दिलजीतला पाठीमागून मिठी मारताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोत दोघेही एकमेकांकडे बघून हसताना दिसतायेत.

दरम्यान, सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिलजीत कार्तिकच्या "भूल भुलैया 3" मधील "हरे कृष्ण हरे राम" हे गाणे गाताना दिसत आहे. या चित्रपटात कार्तिकने साकारलेली 'रुह बाबा' ही भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT