Akshay Kumar luxury lifestyle
बॉलीवूडमध्ये गेल्या दोन दशकांपासून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे त्याने बॉक्स ऑफिसवर राज्य केले आहे. मात्र, त्याचा प्रवास सोपा नव्हता. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या अक्षयने आपल्या मेहनतीच्या जोरावर आज प्रचंड संपत्ती, आलिशान गाड्या आणि जगभरात अनेक घरे मिळवली आहेत.
९ सप्टेंबर १९६७ रोजी पंजाबमधील अमृतसर येथे जन्मलेल्या अक्षय कुमारचे खरे नाव राजीव हरिओम भाटिया आहे. त्याचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत होते. त्याचे कुटुंब काही काळ दिल्लीत राहिले आणि नंतर मुंबईत स्थायिक झाले. मुंबईतच त्याने डॉन बॉस्को स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि खालसा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
अक्षयने लहानपणापासून मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले. आठवीत असतानाच त्याने तायक्वांदो शिकण्यास सुरुवात केली आणि नंतर बँकॉकमध्ये जाऊन मुए थाईचे प्रशिक्षण घेतले. बँकॉकमध्ये असताना त्याने एका हॉटेलमध्ये शेफ आणि वेटर म्हणूनही काम केले. परतल्यानंतर त्याने मुंबईत मार्शल आर्ट्सचे वर्ग घेणे सुरू केले. याच काळात एका विद्यार्थ्याच्या सल्ल्याने त्याने मॉडेलिंगमध्ये पाऊल ठेवले.
मॉडेलिंग करताना सुरुवातीला फारशी कामगिरी झाली नाही. पण मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याला प्रोजेक्ट्स मिळू लागले. १९८७ मध्ये महेश भट्टच्या ‘आज’ चित्रपटात त्याने मार्शल आर्ट्स प्रशिक्षकाची छोटी भूमिका केली. याच भूमिकेतून त्याचा अभिनय प्रवास सुरू झाला आणि पुढे तो बॉलीवूडचा ‘खिलाडी’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
संपत्ती आणि मानधन
अक्षय कुमार आज भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. एका चित्रपटासाठी तो ६० कोटी ते १४५ कोटी रुपये इतके मानधन घेतो. त्याची एकूण संपत्ती तब्बल ₹२,५०० कोटी असल्याचे सांगितले जाते. जुहूमध्ये त्याचा ८० कोटींचा डुप्लेक्स, कॅनडातील टोरंटोमध्ये अपार्टमेंट आणि बंगला, मॉरिशसमधील समुद्रकिनारी बंगला आणि गोव्यातील व्हिला त्याच्या आलिशान प्रॉपर्टीमध्ये समाविष्ट आहेत.
अक्षय कुमारच्या गॅरेजमध्ये रोल्स रॉयस फॅंटम, मर्सिडीज-बेंझ जीएलएस, रेंज रोव्हर व्होग आणि पोर्शे केयेन अशा लक्झरी कार्सचा ताफा आहे.
सध्या अक्षय कुमार आपल्या कुटुंबासह जुहूमधील बंगल्यात राहतो. विशेष म्हणजे ३८ वर्षांपूर्वी याच घराच्या गेटवर त्याला चौकीदाराने पोर्टफोलिओ शूटसाठी आत सोडण्यास नकार दिला होता आणि त्याला बाहेर हाकलून लावले होते. पुढे याच घराचा तो मालक बनला आणि आज त्याच्या आयुष्याचा हा मोठा टर्निंग पॉईंट ठरला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.