Dog Attack Dainik Gomantak
गोवा

Dog Attack: बोगमाळोत कुत्र्याने घेतला पादचाऱ्याचा चावा, रहिवाशाविरुद्ध वास्को पोलिसांत गुन्हा दाखल

Dog bite incident Bogmalo: नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही घटना १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. घडली. संशयित दीपक यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला अनियंत्रित आणि सुरक्षा उपायांशिवाय सोडून दिले.

Sameer Panditrao

वास्को: बोगमाळो येथील एका रिसॉर्टजवळील मुख्य रस्त्यावर एका पाळीव कुत्र्याने एका पादचाऱ्याला चावा घेतल्याने बोगमाळो येथील रहिवाशाविरुद्ध वास्को पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

वसंत नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही घटना १८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.३० वा. घडली. संशयित दीपक कुमार यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला अनियंत्रित आणि सुरक्षा उपायांशिवाय सोडून दिले.

त्यामुळे सार्वजनिक सुरक्षेसाठी संभाव्य धोका निर्माण झाला. तक्रारदाराने सांगितले की, कुत्रा रिसॉर्टच्या गेटमधून बाहेर पडला आणि मुख्य रस्त्यावरून चालत असलेले त्यांचे भाऊ गोकुळदास नाईक यांना चावला. गोकुळदास यांच्या उजव्या पायाला जखमा झाल्या.

त्यामुळे रक्तस्राव झाला. तक्रारीच्या आधारे, वास्को पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम २९१ अंतर्गत प्राण्यांशी निष्काळजीपणाने वागल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास वास्को पोलिस स्थानकाचे ‘पीएसआय’ मयूर सावंत करत आहेत.

पोलिस निरीक्षक वैभव नाईक यांच्या देखरेखीखाली आणि मुरगाव डीवायएसपी गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT