Mumbai Goa Highway Accident Dainik Gomantak
गोवा

Bogmalo Accident: भरधाव दुचाकीने दिली धडक, चालक उडून पडला रस्त्यावर; भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू

Bogmalo Accident Death: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लोरियना लुकास आणि तिची सोबती दाबोळी चौकातून बोगमाळोकडे जात असताना रंघवी इस्टेट मार्गावर समोरून वेगात येणाऱ्या दुचाकीशी त्यांची धडक झाली.

Sameer Panditrao

वास्को: बोगमाळो येथील रंघवी इस्टेट मार्गावर शुक्रवारी (ता. ८) रात्री दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात आल्बिन राजू (वय २८) याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या दुचाकीवरील फ्लोरियना लुकास आणि तिच्या मागे बसलेली एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. या अपघाताची नोंद वास्को पोलिसांत झाली असून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्लोरियना लुकास आणि तिची सोबती दाबोळी चौकातून बोगमाळोकडे जात असताना रंघवी इस्टेट मार्गावर समोरून वेगात येणाऱ्या दुचाकीशी त्यांची धडक झाली. ही दुचाकी आल्बिन राजू चालवत होता. धडक इतकी जोरदार होती की दोन्ही दुचाकीवरील प्रवासी रस्त्यावर फेकले गेले.

अपघातानंतर तिघांनाही तातडीने उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र आल्बिनची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी गोमेकॉ (गोवा मेडिकल कॉलेज) येथे हलवण्यात आले. वाटेतच त्याचा मृत्यू झाला. जखमी फ्लोरियना आणि दुसरी महिला उपचाराखाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

या अपघाताचा पुढील तपास वास्को पोलीस करीत आहेत. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावर रात्रीच्या वेळी वेगाने वाहन चालवण्याचे प्रमाण जास्त असून पोलिसांनी वेगमर्यादा नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

SCROLL FOR NEXT