पेडणे तालुक्यातील भटवाडी-कोरगाव येथील डोंगराळ भागात आज सकाळी रशियन नागरिकाचा मृतदेह आढळून आला. याघटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली, यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पेडणे (Pernem) पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस घटनास्थळी गेले. तत्पूर्वी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तसेच परिसरात तणावाचे वातावरण होते.
पोलिसांनी (police) मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. काही महिला रानमेवा काढण्यासाठी गेली होत्या, त्यावेळी त्यांनामृतदेह दिसला. मयताचे नाव व्हिटाली आलेक्सीव्हिस्किव्ह असे असून तो भटवाडी-कोरगाव येथे राहत होता. घरमालक आणि त्याच्या रशियन मित्राने ओळख पटवली. मृतदेह बांबोळी येथे शवचिकित्सेसाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यूचे कारण समजले नाही.
दरम्यान, बेकायदेशीररीत्या दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि गोळ्या बाळगल्याप्रकरणी कोकण रेल्वे पोलिसांनी (Railway Police) ठाणे रामा (22, मूळचा बाडमेर, राजस्थान) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी (Goa Police) दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीच्या आधारे आर्म्स अॅक्ट 1959 च्या 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेक कुमार पांडे, गुप्तचर अधिकारी, नार्कोटीक कंट्रोल ब्युरो, सब झोन गोवा, यांनी पर्वरी (Porvorim) येथे तक्रार दाखल केली होती. संबंधित आरोपी रामा याच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि 18 गोळ्या तसेच दारुगोळा बेकायदेशीरपणे सापडला होता. अंमली पदार्थ जप्त करण्यासाठी गोवा सेलने ही कारवाई केली होती. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.