Agarvada Tempo Accident Dainik Gomantak
गोवा

Agarvada Accident: चालकाचा ताबा सुटून दुचाकीला दिली धडक; भरधाव टेम्पोखाली येऊन एक ठार, दुसरा गंभीर

Goa Agarvada Accident: मालवाहतूक टेम्‍पो (जीए ०८ व्ही ४९९८) हा भरधाव वेगाने आगरवाड्याच्‍या दिशेने येत होता. चालक रत्नाकर दत्ताराम नाईक (सांकवाळ-वास्‍को) याचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्‍याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (एमएच ०७ के एके ९२०६) जोरदार धडक दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: बोडकोधेनू-आगरवाडा येथे आज सोमवारी सकाळी टेम्‍पो व दुचाकी या दोन वाहनांमध्‍ये झालेल्‍या भीषण अपघातात रामकृष्ण प्रदीप निखार्गे (२९,आजगाव-सिंधुदुर्ग) याचा मृत्‍यू झाला तर गणपत रमाकांत केरकर (२७, तिरोडा-सिंधुदुर्ग) हा गंभीर जखमी झाला आहे. गणपत हा दुचाकी चालवत होता तर रामकृष्‍ण त्‍याच्‍यामागे बसला होता.

मिळालेल्‍या माहितीनुसार, मालवाहतूक टेम्‍पो (जीए ०८ व्ही ४९९८) हा भरधाव वेगाने आगरवाड्याच्‍या दिशेने येत होता. चालक रत्नाकर दत्ताराम नाईक (सांकवाळ-वास्‍को) याचा वाहनावरील ताबा सुटला आणि त्‍याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला (एमएच ०७ के एके ९२०६) जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीच्‍या मागे बसलेला व बेसावध असलेला रामकृष्ण निखार्गे हा रस्‍त्‍यावर पडला व टेम्‍पोच्‍या चाकाखाली सापडला. गंभीर अवस्‍थेत त्‍याला उपचारांसाठी इस्‍पितळात दाखल केले असता डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. तर, दुचाकीस्‍वार गणपत केरकर हा गंभीर जखमी झाला असून, त्‍याच्यावर म्‍हापसा येथील आझिलो इस्‍पितळात उपचार सुरू आहेत.‍माहिती मिळताच मांद्रे पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेऊन पंचनामा केला. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT