Crime Dainik Gomantak
गोवा

Bodgeshwar Temple Theft : चोरांच्‍या टोळीला आणले गोव्‍यात; नऊ दिवसांची कोठडी

Bodgeshwar Temple Theft : काल शनिवारी (ता. ११) म्हापसा पोलिसांनी सदर टोळीला ट्रान्झिट रिमांड ऑर्डरवर खोपोली (महाराष्ट्र) पोलिसांच्या ताब्यातून आपल्या ताब्‍यात घेतले होते. त्‍यांनी खोपोली पोलिसांशी संपर्क साधत सदर टोळीला गजाआड केले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Bodgeshwar Temple Theft :

म्हापसा येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देव बोडगेश्‍‍वर मंदिरात चोरी केल्याप्रकरणी चार जणांच्या टोळीला कोल्हापूरमध्‍ये अटक करण्यात आली होती.

या टोळीला म्हापसा पोलिसांनी अखेर आपल्या ताब्यात घेत गोव्यात आणले. संशयितांना स्थानिक न्यायालयाने ९ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

काल शनिवारी (ता. ११) म्हापसा पोलिसांनी सदर टोळीला ट्रान्झिट रिमांड ऑर्डरवर खोपोली (महाराष्ट्र) पोलिसांच्या ताब्यातून आपल्या ताब्‍यात घेतले होते. त्‍यांनी खोपोली पोलिसांशी संपर्क साधत सदर टोळीला गजाआड केले होते.

म्हापसा पोलिसांनी दिलेल्‍या माहितीच्या आधारावर रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलिसांनी चौघांना कोल्हापूरमधून अटक केली होती. राजू फरत शेख (१७, रा. कोलकत्ता व मूळ बांगलादेश), इम्रान शहीद शेख (२४, सुरत), राकिव कुल मोहम्मद शेख (२८, सुरत) आणि मुजाहिद गुलजार खान (२८, रा. पुणे व मूळ झारखंड) अशी त्‍यांची नावे आहेत.

पोलिसांनी संशयितांकडून आतापर्यंत ७ लाख २८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्री बोडगेश्वर मंदिरातील दोन फंडपेट्या फोडून सुमारे १२ लाखांची रोकड लंपास केल्याची ही घटना २९ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. चोरट्यांनी मंदिरातील सुरक्षारक्षकाला जीवे मारण्याची धमकी देत त्याला ओलीस ठेवले आणि मंदिरात चोरी करून पोबारा केला होता.

संशयित घटनेच्‍या दिवशीच आले होते गोव्‍यात

संशयित हे सराईत गुन्हेगार असून घटनेच्या दिवशीच ते गोव्यात दाखल झाले होते. त्यानंतर बोडगेश्‍‍वर मंदिर हेरून त्यांनी चोरीचा बेत आखला आणि दोन फंडपेट्या फोडून ते पहाटेच्या वेळी कोल्हापूरला जाणाऱ्या पहिल्या एसटी बसने पळून गेले.

मात्र म्हापसा पोलिसांनी पुरविलेल्या माहितीच्या जोरावर संशयितांना खोपोली पोलिसांनी कोल्हापूर बसस्थानकावरून (ता. ३० एप्रिल) ताब्यात घेतले. नंतर खोपोली चौकशीअंती संशयितांकडून चोरीचा मुद्देमालही जप्त केला होता. खोपोली पोलिस त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशाच प्रकारे मंदिरातील चोरीसंदर्भात या टोळीच्या मागावर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: ‘ओंकार’चा तोरसे, तांबोसेत धुमाकूळ ! लोकांच्या जमावामुळे गोंधळ; कामात अडथळा आणल्यास गुन्हे नोंदवण्याचा इशारा

Goa Crime: घरातून ड्रग्सपुरवठा, 3 दिवस पोलिसांना हुलकावणी, पेडलर 'तेहरान' अखेर फातोर्डा पोलिसांना शरण

Goa Live Updates: महिला पर्यटकाला मनस्ताप देणाऱ्या 3 टॅक्सीवाल्यांना अटक

Codar IIT Project: ‘गोवा विकायला काढलाय’! आयआयटी आंदोलनात काँग्रेसची उडी; विरियातो उठवणार संसदेत आवाज

Adivasi Bhavan: आदिवासी भवनाचे काम 2 महिन्‍यांत सुरू करणार! तवडकरांची हमी; GSIDC कडून प्रक्रिया सुरू

SCROLL FOR NEXT