Bodgeshwar Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापसा बोडगेश्वर जत्रोत्सव प्लास्टिकमुक्त करणार !

उपसभापतींनी देवस्थान समितीशी चर्चा केली. 4 ते 15 जानेवारीपर्यंत हा जत्रोत्सव चालणार आहे.

दैनिक गोमन्तक

Mapusa: येथील प्रसिद्ध असलेल्या श्री देव बोडगेश्वर संस्थानच्या 88व्या महान जत्रोत्सव व 30व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन नियोजनबद्ध व प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला आहे. मंगळवारी जत्रोत्सव आयोजनाच्या व्यवस्थेविषयी उपसभापती तथा स्थानिक आमदारांनी देवस्थान समिती, पालिका व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. दि. 4 ते 15 जानेवारीपर्यंत हा जत्रोत्सव चालणार आहे.

यंदाही जत्रोत्सव हा प्लास्टिकमुक्त करण्याचा चंग म्हापसा पालिका व देवस्थान समितीने बांधला आहे. त्याचप्रमाणे गोबी मंच्यूरीयनच्या स्टॉल्सना याठिकाणी मज्जाव असेल. जे दुकानदार ‘एफडीए’ परवाना सादर करतील, त्यांनाच ही गोबी मंच्यूरीयन स्टॉल थाटण्यास परवानगी मिळेल, असे बोडगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी स्पष्ट केले.

उपसभापती जोशुआ डिसोझा, नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर, उपनगराध्यक्ष चंद्रशेखर बेनकर, मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर, म्हापसा नगरसेवक, बोडगेश्वर देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर, सचिव अ‍ॅड. वामन पंडित, पोलीस निरीक्षक परेश नाईक, म्हापसा अग्निशमन दलाचे प्रभारी बॉस्को फेर्रांव तसेच साबांखा, आरोग्य, वाहतूक व इतर विभागांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

प्रत्येक दुकानांकडून 5 हजार रुपये शुल्क हे कचरा ठेव म्हणून घेतले जाईल. जत्रेनंतर काहीजण कचरा टाकून जातात. नंतर समिती तो हटवते, असे सचिव अ‍ॅड. वामन पंडित यांनी सांगितले.

फेरीवाल्यांवर असेल पोलिसांची नजर...

जत्रोत्सवात अनेकदा फेरीवाल्यांकडून भाविकांना त्रास दिला जातो. काहीजण रस्त्याशेजारी किंवा पदपथावर बस्तान मांडतात, त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळी वाट नसते. ही समस्या भेडसावू नये, यासाठी म्हापसा पोलिसांकडून या फेरीवाल्यांवरच विशेष लक्ष ठेवण्यासाठी समर्पित पथकाची नेमणूक केली जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी बैठकीवेळी दिली.

अशी असेल व्यवस्था

  • प्रत्येक स्टॉल्समध्ये अंतर असावे.

  • तीन स्टॉल्समध्ये एक,असे अग्निरोधक हवेत.

  • जत्रोत्सवात ८०० हून जास्त स्टॉल्स.

  • फूड कोर्ट एका बाजूस, दुसऱ्या बाजूस खेळण्यांची दुकाने

  • कोंडी टाळण्यासाठी विशेष पार्किंग व्यवस्था

  • जत्रोत्सवात पूर्णवेळ अग्निशमन, रुग्णवाहिका तैनात.

बोडगेश्वर जत्रोत्सव नियोजनबद्ध करण्यासाठी आजची बैठक होती. कमिटीने जत्रेसाठी प्रथमच आराखडा बनवला आहे. जत्रेवेळी गर्दी वाढते. त्यामुळे सर्व सुरळीत व्हावे,यासाठी प्रयत्न आहेत. - जोशुआ डिसोझा, उपसभापती

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup 2025: जल्लोष! FC Goa सुपरडुपर हिट; सलग दुसऱ्यांदा जिंकला कप, अनेक विक्रमांना गवसणी

Arpora: ‘रोमियो लेन’बाबत धक्कादायक माहिती! 15 दिवसांत बांधकाम पाडण्याचा दिला होता आदेश; आगीस पंचायत खाते, CZMA जबाबदार

आग भडकली, धावपळ सुरु झाली, 40 सेकंदात सर्व काही संपले! हडफडे दुर्घटनेप्रकरणी तिघे निलंबित; मालकाच्या अटकेसाठी पोलीस दिल्लीत

Partgali Math: सुमारे 1000 वर्षांपूर्वी सारस्वत ब्राह्मण गोव्यात आले, 550 वर्षांपूर्वी वैष्णवांनी पर्तगाळीत मठ बांधला..

Horoscope: आजचा दिवस तुमच्यासाठी खास! 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ, वाचा तुमचे भविष्य!

SCROLL FOR NEXT