Bicholim: पाच शतकांचा इतिहास लाभलेल्या गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकमधील भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या डिचोली तालुक्यातील वरगांव-पिळगाव येथील श्री चामुंडेश्वरी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव दि. 5 ते 9 जानेवारी 2023पर्यंत साजरा होणार आहे, अशी माहिती या देवस्थानचे अध्यक्ष तुषार टोपले यांनी दिली.
7 रोजी कालोत्सवानिमित्त सकाळी जगदंबा श्री चामुंडेश्वरी देवी व पंचायतनास महाअभिषेक, महापूजा व महाआरती. सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत स्वहस्ते श्रींवर अभिषेक व महिला भाविकांना कुंकमार्चन सेवा मुळ पुरुष मंदिरामध्ये केली आहे.
तसेच पूर्ण दिवस ओटी भरणे, मागणीच्या भाविकांतर्फे पड अर्पण सेवा. दुपारी महाप्रसाद, रात्री 8 महाप्रसाद, रात्री 9.30 पुराण वाचन, रात्री 11 वाजता श्री शांतादुर्गा महिला दिंडी पथक डिचोली व सवाद्य श्री जगदंबा चामुंडेश्वरीची रौप्य शिबिकेतून मिरवणूक व उत्तर गोव्यातील प्रसिद्ध नौकाविहार उत्सव आकर्षक आतिषबाजी होईल.
त्यानंतर दशावतारी नाट्यप्रयोग सादरीकरण. ५ रोजी, सकाळी धार्मिक विधी, रंगपूजी, पुराण, पालखी उत्सव व महाआरती. ६ रोजी, सकाळी धार्मिक विधी, रात्री 9वा. मोहनदास पोळे व साथी यांचा भजनाचा कार्यक्रम. रात्री 11वा. दीपस्तंभ पूजा, नंतर श्री क्षेत्रपालाजवळ खेत्र व पालखी, महाआरती.
8 रोजी सकाळी श्रींच्या उत्सवमूर्तीचे सभामंडपातून मिरवणुकीने मंदिरात आगमन, आरती, धार्मिक विधी, रंगपूजा, पुराण, सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी व महाआरती.9 रोजी, सकाळी धार्मिक विधी, रंगपुजा, पुराण, पालखी मिरवणूक, रात्री 8वा. फडते थिएटर्स प्रस्तुत ‘अनिकेताली...मामेभयण’ हे सनम फडते लिखित व दिग्दर्शित दोन अंकी कोकणी नाटक होईल.
दरम्यान, डिचोलीत या जत्रौत्सवनिमित्त (काला) थाटणाऱ्या फेरीविक्रेत्यांनी शुल्क भरुन देवस्थानच्या कारकूनकडे ता. 1 जानेवारी रोजी नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.