पणजी: भाजपचे संघटनपर्वात सर्वजण एकत्र आल्याचे चित्र असतानाच प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली.
यापूर्वीही लोकसभा निवडणुकीत सिक्वेरांकडून अपेक्षित कामगिरी झाली नव्हती, तसेच सिक्वेरा प्रतिनिधित्व करत असलेल्या नुवे मतदारसंघात ५० टक्केही सदस्यत्व नोंदणी न झाल्याने तेथे मंडळ अध्यक्षाची निवडणूक न घेता मंडळ अध्यक्ष नियुक्तीची नामुष्की भाजपवर ओढवली आहे.
मडकई, वेळी, नुवे आणि न्हावेली या चार मतदारसंघांमध्ये अद्याप ५०टक्के सदस्य नोंदणी झालेली नाही. मडकईत युती असूनही आम्हांला पक्ष भक्कम करणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सदस्य नोंदणीत अपयश आले तरी आगामी निवडणुकांसाठी सर्व मंडळांना सज्ज राहावे लागेल. मडकई आणि वेळी या दोन मतदारसंघात ५० टक्के सदस्य नोंदणी पूर्ण होणार आहे, असे तानावडे म्हणाले.
गोव्यातील भाजप सदस्य नोंदणी मोहीम अद्याप काही मतदारसंघांमध्ये ५० टक्केच्या खाली राहिली असून, याबाबत प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विशेषतः नुवेममधील स्थितीवर चर्चा करताना तानावडे यांनी मंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्या नेतृत्वाखाली नुवेममध्ये अपेक्षित सदस्यसंख्या गाठता आलेली नाही, असे जाहीर करून यावर त्यांनी विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. भाजप मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मंत्र्यांवर सडेतोड भाष्य केले.
पणजीत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत नवीनच झालेल्या भाजप मंडळ अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, मतदारसंघ विजयासाठी मंडळ अध्यक्षांचे काम अत्यंत महत्त्वाचे असते. बूथ अध्यक्ष भक्कम असेल तरच मतदारसंघ जिंकता येतो. आमदार कार्यालय हे पक्षाचे कार्यकेंद्र मानले जाते.
जिल्हा अध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
भाजपचे जिल्हाध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया १० जानेवारीला होणार असून ११ जानेवारीला निकाल जाहीर होतील. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची निवडणूक होणार असल्याचेही तानावडे यांनी सांगितले. भाजपने गोव्यात ४ लाखांहून अधिक सदस्य नोंदणी केली असली तरी काही मतदारसंघांतील अपयशावर चिंतनाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. गोव्यात ४ लाखांहून अधिक सदस्य मोहीम पूर्ण केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.