Megha Chakraborty And Sahil Phull
Megha Chakraborty And Sahil PhullInstagram

Will You Marry Me? अभिनेता साहिल फुलने अभिनेत्री मेघा चक्रवर्तीला गोव्याच्या किनारी केलं प्रपोज

Megha Chakraborty And Sahil Phull Gets Engaged In Goa: साहिलने ०१ जानेवारी रोजी मेघाला प्रपोज केले. दोघांनी येथेच साखरपुडा देखील उरकला.
Published on

Megha Chakraborty And Sahil Phull Gets Engaged In Goa

पणजी: अभिनेता साहिल फुलने अभिनेत्री मेघा चक्रवर्तीला लग्नासाठी मागणी घातली. गोव्याच्या किनारी साहिलने मेघाला प्रपोज केलं एवढेच नव्हे तर दोघांनी किनाऱ्यावर साखरपुडा देखील उरकला. दोघांनी गोव्यातील या खास क्षणाचे फोटो सोशल मिडियावरून शेअर करत, दोघांच्या चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.

साहिलने ०१ जानेवारी रोजी मेघाला प्रपोज केले. दोघांनी येथेच साखरपुडा देखील उरकला. आमच्या प्रेमाच्या प्रवासाने नवे वळण घेतले आहे. नव्या आयुष्याचा प्रवास आम्ही सुरु करतोय, असे म्हणत मेघा आणि साहिलने गोव्यातील साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, सर्वांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Megha Chakraborty And Sahil Phull
धक्कादायक! बेंगळुरूच्या पर्यटकांना गोव्यात नाईट क्लबमध्ये ठेवले ओलीस, मारहाण करून 80,000 रुपये लुटले

साहिल फुलने ‘दिल ए काउच’, ‘एनआयएस पटियाला’, ‘कुंडली भाग्य’, ‘उतरन’, ‘हैवान’, ‘सुहागन,’ ‘पिया रंगरेझ’, ‘जगन्नाथ और पूर्वी की दोस्ती अनोखी’ आणि ‘काटेलाल अँड सन्स’ अशा शोमध्ये काम केलं आहे. तर, मेघाने ‘इमली’ आणि ‘मिश्री’ यासारख्या टीव्ही शोमध्ये काम केले आहे.

मेघा आणि साहिल गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र आहेत. दोघांनी जुन्या नात्याचे लग्नात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. फोटो शेअर करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. टीव्ही आणि सिने विश्वातील तारकांनी दोघांना नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Megha Chakraborty And Sahil Phull
Canacona: रस्त्यावरील बैलांच्या झुंजेने घेतला 40 वर्षीय व्यक्तीचा बळी; चार दिवसांचे उपचारही ठरले फेल

मिळालेल्या माहितीनुसार मेघा आणि साहिल येत्या काही दिवसांत लग्न करणार आहेत. दोघेही २१ जानेवारीला जम्मूमध्ये लग्न करणार आहेत. या लग्न सोहळ्याला फक्त जवळचे नातेवाईक आणि घरातील लोक उपस्थित राहणार आहेत. दोघांनी हा लग्नसोहळा अगदी साधा ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com