तुकाराम परब कुणबी साडी विणतांना Dainik Gomantak
गोवा

तुकारामांची 'डोळस' कामगिरी विणली कुणबी साडी

गोव्याच्या वेशभूषेतील मानाचा तुरा समजल्या जातो कुणबी साडी

अनिल पाटील

आंधळ्याच्या गायी देव राखतो असे म्हणतात. पण त्यांची कृती जर डोळस माणसाला लाजवेल अशी असेल तर त्याला काय म्हणावे ? हे सांगायचे कारण म्हणजे उत्तर गोव्यातील वरखंडचा तुकाराम परब याला तुम्ही पाहिले तर तुम्ही अचंबित व्हाल. तुकाराम जन्मजात अंध पण तो विणकामात अत्यंत निष्णात आहे. त्यात ही गोव्याच्या वेशभूषेतील मानाचा तुरा समजल्या जाणाऱ्या कुणबी साडी विणण्याचे कुशल काम तुकाराम डोळस माणसाला लाजवेल अशा पद्धतीने करतो. (blind Tukaram Parab weaved famous Kunbi saree in Goa costume)

तुकाराम जन्मजात अंध असल्याने इथं गोव्यात त्याला शिक्षण मिळत नव्हते म्हणून त्याने अंध अपंग व्यक्तींसाठी कार्यरत असणाऱ्या मुंबईच्या ब्लाईंड इंडिया कडे धाव घेतली. आणि तिथेच त्याने विणकामाचे धडे घेतले. त्यात तो निष्णांत झाल्यानंतर त्याने परत गोवा गाठला. 1983 दरम्यान हस्तकला आणि कापड निर्मिती विभागात त्याला नोकरी मिळाली आणि तुकारामचे भाग्य उजळले.

तुकाराम परब कुणबी साडी विणतांना

हस्तकला विणकामात निपुण असणाऱ्या तुकारामला त्याच्या मनाप्रमाणे नोकरी मिळाल्याने तो अधिकच कुशल बनत गेला. गेल्या काही वर्षांपासून तुकाराम लूम वर कुणबी साडी विणकाम करतो. आणि नवशिक्यांना साडी विणण्याचे धडे देतोय. डोळसना दोनच डोळे पण आंधळ्यांना 10 डोळे हे तुकारामाचा तत्वज्ञान आहे. स्पर्श आणि आवाजाच्या साहाय्याने तुकाराम विणकाम करताना लाखो धाग्यांमधून तुटलेला धागा समजून घेतो. मात्र रंगसंगती आणि इतर कामांसाठी सहाय्यकाची मदत त्याला घ्यावे लागते. साडीतील त्या त्या रंगाचा धागा जुळवला आणि इतर छोट्या कामाची मदत झाली की तुकारामकडून कुणबी साडी तयार.

कुणबी साडी व राज्य सरकारचे प्रयत्न

देशातील वेगवेगळ्या प्रांतात प्रमाणे साडीचे प्रकार आहेत. त्यात गोव्याची कुणबी साडीही आता प्रसिद्ध आहे. गुलाबी रंगसंगतीची ही साडी वेगाने लोकप्रिय होत आहे. मात्र त्याप्रमाणे साडी बनवणारी कुशल कामगारांचा अभाव आहे. म्हणून राज्य सरकारच्या हस्तकला आणि कापड निर्मिती खात्याच्या वतीने विणकरांना आर्थिक सहाय्य देऊन काम करून घेतले जाते. तर नव्याने विणकाम शिकू पाहणार्‍यांना मोफत प्रशिक्षण देण्याची सोय ही या खात्याच्या वतीने करण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT