Blade Runner, a goodwill ambassador for cancer-stricken athletes Dainik Gomantak
गोवा

‘रेन रन’मध्ये दिसणार प्रदीप, मारियोलाची जिद्द

ब्लेड रनर, कर्करोगावर मात केलेल्या ॲथलिट शर्यतीसाठी सदिच्छा दूत

दैनिक गोमन्तक

पणजी : आगामी ‘रोटरी रेन रन’मध्ये ब्लेड रनर प्रदीप कुंभार व कर्करोगावर मात केलेल्या मारियोला मथायस यांची जिद्दी दिसेल. ते या शर्यतीचे सदिच्छा दूत असतील.

रोटरी रेन रन येत्या 31 जुलै रोजी बांबोळीतील ॲथलेटिक्स स्टेडियमवर होईल. कर्करोगाचे लवकर निदान, महिलांचे आरोग्य आणि शिक्षणाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने शर्यत घेण्यात येत आहे.

मुंबईतील विमा कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक असलेले प्रदीप 52 वर्षीय आहेत. 2018 मध्ये ट्रायथलॉन स्पर्धेसाठी सायकलिंगचा सराव करत असताना मुंबईतील महामार्गावर ट्रक अपघातात त्यांना उजवा पाय गमवावा लागला.

त्यांना तब्बल आठ महिने इस्पितळात राहावे लागले होते. त्यानंतर जिद्दीने प्रदीप यांनी ॲथलिट या नात्याने यशस्वी पुनरागमन केले. कृत्रिम पायासह ते 2019 मध्ये चालू लागले, नंतर हळूहळू धावणे, सायकलिंग व जलतरणात ते तरबेज बनले.

उजव्या पायाला ब्लेड बसविल्यानंतर 2021 मध्ये त्यांनी 10 किलोमीटर रोड रेसमध्ये भाग घेतला. राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेतही त्यांनी कितीतरी पदके जिंकली आहेत.

पणजी येथील मारियोला 61 वर्षीय असून त्या हौशी धावपटू आहेत. 2019 मध्ये त्यांना कर्करोगाचे निदान झाले. 2020 मध्ये त्यांनी उपचार पूर्ण केले. सुरवातीस दररोज वेगाने चालणे व योग यावर त्यांनी भर दिला.

नंतर जलतरण, सायकलिंग, धावणे त्यांच्या नित्यक्रमाचा भाग बनला. ‘‘प्रत्येक सकाळी थोडेफार खेळणे हे माझे प्रेम होते, पण नंतर आरोग्याने धक्का दिला. पुनरागमनाची तीव्र इच्छा होती. एखाद्या खेळाचा सराव केल्याने केवळ शारीरिक शक्ती प्राप्त होत नसून आव्हानास सामोरे जाताना मानसिकत कणखरताही लाभते,’’ असे मारियोला म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT