Black Rice Canacona Goa X
गोवा

Black Rice Cultivation: काणकोणात प्रथमच ‘ब्लॅक राईस’ची लागवड! कृषी खात्याचा प्रयोग; 1000 चौ.मी. क्षेत्रात उत्पादन

Black rice farming: काणकोणमधील बहुतेक शेतकरी ज्योती, कर्जत, जया या भात बियाण्यांना पसंती देतात. त्याशिवाय गोवा धन-३, रत्नागिरी-६ या भात बियाण्यांची पेरणी शेतकऱ्यांकडून केली जाते.

गोमन्तक डिजिटल टीम

Black Rice Cultivation Canacona Goa

काणकोण: काणकोणात यंदा खरीप भात पीक समाधानकारक आले आहे मात्र अवेळी झालेल्या पावसाने उभे पीक आडवे झाल्याने काही प्रमाणात नुकसानी शेतकऱ्यांना सहन करावी लागली आहे. यंदा प्रथमच कृषी खात्याने ब्लॅक राईसची लागवड एक हजार चौरस मीटर क्षेत्रात मोलू गावकर यांच्या शेतात केली होती.

या भाताच्या वाणांची वाढ दीड मीटरपर्यंत होत असते. यंदा भात पीक तयार होतानाच अवेळी आलेल्या पावसामुळे ही भात शेती आडवी झाली, त्यामुळे अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळाले नाही. या ‘ब्लॅक राईस’ला मोठी मागणी आहे, असे सहाय्यक विभागीय कृषी अधिकारी सर्वानंद सर्वणकर यांनी सांगितले. यंदा कृषी खात्याने ज्योती, जया, कर्जत ही भातबियाणी वितरित केली होती.

सरकारने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना व सोयीसवलती उपलब्ध केल्यामुळे युवा पिढी कृषी क्षेत्राकडे हळूहळू वळू लागली आहे, ही जमेची बाजू आहे. तालुक्यातील ३९२० शेतकऱ्यांकडे कृषी कार्डे असून १५५३ शेतकरी प्रधानमंत्री कृषी योजनेखाली आहेत. मात्र, अद्याप सुमारे तीन हजार शेतकरी व बागायतदार वेगवेगळ्या कारणांसाठी कृषी कार्डापासून वंचित आहेत.

काणकोणमधील बहुतेक शेतकरी ज्योती, कर्जत, जया या भात बियाण्यांना पसंती देतात. त्याशिवाय गोवा धन-३, रत्नागिरी-६ या भात बियाण्यांची पेरणी शेतकऱ्यांकडून केली जाते. त्यासाठी कृषी खात्याकडून बियाण्यावर पन्नास टक्के अनुदान दिले जाते. अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी रासायनिक खतावर अनुदान दिले जाते. मात्र, कृषी खाते सध्या जैव खताला प्रधान्य देत आहे. आजही काणकोणमधील काही शेतकरी शेती लागवडीसाठी पालापाचोळा, शेणखत यांचा वापर करून भातपीक घेत आहेत, असे गावडोंगरी येथील एक युवा शेतकरी जानू गावकर व खोतीगावातील कृष्णा गावकर यांनी सांगितले.

भातकापणीसाठी हार्वेस्टिंग मशीनचा वापर

१. शेतकऱ्यांना भातकापणीसाठी खासगी क्षेत्रातील हार्वेस्टिंग मशीन कृषी खात्याकडून उपलब्ध करून दिले जाते. त्याच्या एकूण खर्चावर अनुदान दिले जाते. हार्वेस्टिंग मशीनचे दर मिनिटावर अवलंबून आहेत. कमीतकमी पाच मिनिटे काम केल्यानंतर ३३३ चौरस मीटर भातशेतीची कापणी मशिनद्वारे केली जाते, त्यासाठी २३३ रूरुपये आकारले जातात. त्यावर कृषी खाते ११७ रुपये अनुदान देते.

२. ६० मिनिटांत ४ हजार चौरस मीटर क्षेत्रातील भातकापणी केली जाते, त्यासाठी २८०० रुपये आकारले जातात. त्यावर कृषी खाते १४०० रुपये अनुदान देते. १२० मिनिटांत ८००० चौरस मीटर क्षेत्रातील भातकापणी केली जाते, त्यासाठी ५६०० रुपये भाडे आकारले जाते, तर कृषी खाते २८०० रुपये अनुदान देते. हे अनुदान हार्वेस्टिंग मशिनच्या मालकाला दिले जाते.

काजू, आंब्याला चांगला मोहर

काणकोणात यंदा काजू, आंब्याला चांगला मोहर आला आहे. थंडीही या दोन्ही पिकांना पूरक अशी पडत आहे. त्यामुळे ही दोन्ही पिके यंदा समाधानकारक येण्याची अपेक्षा कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. काणकोणात ३५०० हेक्टर जमिनीवर काजू लागवड होते. गावडोंगरी, खोतीगाव, श्रीस्थळ, खोला येथील सुमारे पन्नास टक्के रहिवांशांचे अर्थकारण काजू पिकावर अवलंबून आहे. कणकोणमधील काजू पीक पूर्णपणे ऑर्गेनिक असल्याचा दावा करण्यात येत आहे.

३५० हेक्टरात भाजी लागवड

काणकोणात एकूण १८०० हेक्टर जमीन खरीप भातशेती लागवडीखाली आहे. तालुक्यात सुमारे ५० हेक्टर शेतजमीन वायंगण पिकाखाली आहे. तालुक्यात सर्वाधिक खरीप भातशेतीची जमीन गावडोंगरी पंचायत क्षेत्रात आहे. काणकोणात शेती व बागायती क्षेत्राखाली ९१२० हेक्टर जमीन लागवडीखाली आहे. खरीप हंगामात २५० हेक्टर जमीन व रब्बी हंगामात ३५० हेक्टर जमीन भाजी लागवडीखाली आहे. ३५०० हेक्टर जमिनीवर काजू लागवड होते.

उकड्या तांदळाला मागणी अधिक

काणकोणमधील उकड्या तांदळाला राज्यभरातून मागणी आहे. कर्जत, ज्योतीचे उकडे तांदूळ सरासरी ५० ते ६० रुपये किलो दराने विकले जातात. काणकोणात बहुतेक शेतकरी यांत्रिक पद्धतीने शेती करत असल्याने शेती व्यवसाय सध्या काही प्रमाणात किफायतशीर बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT