Goa Assembly Session Dainik Gomantak
गोवा

Goa Assembly Session: विधानसभेत काँग्रेसचा ब्लॅक मंडे

राहुल गांधींचे संसद सदस्यत्व रद्द झाल्यानंतर काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर निदर्शन करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Assembly Session राहुल गांधींचे संसद सदस्यत्व 23 मार्चपासून रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणावर निदर्शन करण्यात आली.

राहुल गांधी यांना खासदार म्हणून अपात्र ठरवल्याच्या विरोधात महागठबंधनच्या नेत्यांनी बिहारमधील पाटणा येथे काळ्या पट्ट्या बांधून निषेधार्थ मोर्चा काढला होता.

तसेच काँग्रेसच्या आमदारांनी चेन्नईतील विधानसभेत काळे शर्ट घालून प्रवेश केला होता. काहीशी तशीच परिस्थिती आज गोवा विधानसभेत पाहायला मिळाली.

गोवा काँग्रेसचे युरी आलेमाव, अल्टोन डिकॉस्टा, कार्लोस परेरा यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काळे कपडे परिधान करून प्रवेश केला राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेत्यांनी काळे कपडे घालून प्रवेश केला.

सत्य बोलणारे आणि भाजप सरकारचा खोटेपणाचा बुरखा उघड करणारे राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द केलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो.

निषेधाचे प्रतीक म्हणून आम्ही तिघांनीही आज काळे कपडे घातले आहेत, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

मानहानी प्रकरणामध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द झाले. लोकसभा सचिवालयाने आज त्यांच्या अपात्रतेची औपचारिक अधिसूचना जारी केली.

राहुल गांधींचे संसद सदस्यत्व 23 मार्चपासून रद्द झाल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT