Goa Assembly Session: रोजगारासंबंधी मुख्यमंत्र्यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले...

स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे
Goa Assembly Session
Goa Assembly SessionDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात रोजगार निर्मिती व्हावी आणि स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील असून राज्यात जे उद्योग उभारले जातील त्यात 70 टक्के स्थानिकांना रोजगार देण्याची हमी संबंधित उद्योगांकडून घेणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अधिवेशनात सांगितले. गोवा अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस असून यावेळी सावंत बोलत होते.

मार्च 2024 पर्यंत 2572 रिक्त जागा भरण्याची सरकारची अपेक्षा असून सरकार त्यासंबंधी प्रयत्नशील आहे. त्यासाठी राज्यात उद्योगांना गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची मान्यता देताना 70 टक्के स्थानिकांना तेथे रोजगार देण्याची हमी संबंधित उद्योगांकडून घेणार असल्याचेही प्रमोद सावंत यांनी सांगितले.

Goa Assembly Session
Quepem Panchayat Election: केपे तालुक्यातील पंचायत पोटनिवडणुकीत एल्टन डिकॉस्ता यांचे उमेदवार विजयी

राज्यात औद्योगिक विकासासाठी नव्या पारदर्शक आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देणाऱ्या उद्योग धोरणाची आवश्यकता होती. हे लक्षात घेऊन नवीन धोरण तयार करण्यात आले असल्याचे सावंत यांनी काही महिन्यांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com