BJYM Press Conference  Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसचा श्रेय घेण्याचा प्रकार सहन करणार नाही

भाजयुमोचा इशारा; बाबू कवळेकरांकडून विकास झाल्याचा दावा

दैनिक गोमन्तक

केपे : रुरबन मिशन या योजनेंतर्गत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सुमारे तीस कोटी रुपयांची कामे मंजूर करून आणली होती. या कामांचे आता काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा फुकटचे श्रेय घेऊ पाहत असून ते आम्ही सहन करणार नाही,असा इशारा केपे भाजपा युवा मोर्चाने दिला. केपे येथे घेतलेल्या या पत्रकार परिषदेत भाजप युवा मोर्चा अध्यक्ष विराज देसाई यांच्यासह इतर सदस्य हजर होते.

डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने रूरबन मिशन ही योजना केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने दक्षिण व उत्तर गोव्यातील एक एक मतदारसंघात सुरू केली होती. त्यानुसार केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर यांनी केपे मतदारसंघातील पंचायत क्षेत्राचा विकास व्हावा या उद्देशाने सातही पंचायत क्षेत्रात विकासकामे मंजूर करून आणली होती.

विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर असताना कवळेकर यांनी मंजूर करून आणलेल्या सुमारे तीस कोटी रुपयांच्या विकासकामांचे रितसर उद्‍घाटन करून कामे सुरू केली होती, पण काही ठिकाणी निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने कामे सुरू करता आले नव्हते. याचाच फायदा घेऊन आता केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा ही कामे सुरू करून या कामांचे श्रेय लाटू पाहात असल्याचे विराज देसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT