Pallavi Dempo Dainik Gomantak
गोवा

Pallavi Dempo: ''प्रकल्पांबाबत पक्षाची जी असेल, तीच माझी भूमिका''; पल्लवी धेंपो स्पष्टच बोलल्या

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत जिंकून आल्यावर आपण लोकांसाठी अहोरात्र काम करणार. लोकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न असेल.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत जिंकून आल्यावर आपण लोकांसाठी अहोरात्र काम करणार. लोकांचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न असेल. प्रचारावेळी बेरोजगारी, शिक्षण, महिला सशक्तीकरणाबाबत विचारणा झाली. पर्यावरण व विकासकामे एकमेकांसोबत पुढे नेण्यात येतील. प्रकल्पांबाबत भाजपची जी भूमिका असेल तीच आपली असेल, असे भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपे यांनी सांगितले.

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून लोकसभा उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर उमेदवार पल्लवी धेंपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना पर्यावरण व विकासाचे प्रकल्पांत ताळमेळ राखून विकासकामे केली जातील, असे स्पष्ट केले. त्या म्हणाल्या की, भाजपच्या प्रदेश व केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी देऊन आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार. लोकांच्या सेवेसाठी सदोदित काम करणार. विरोधक वारंवार टीका करतात, त्यावर आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. आपण प्रचारावर व लोकांच्या गाठीभेटींवर लक्ष केंद्रीत केले आहे.

दक्षिण गोव्यातील आतापर्यंतच्या प्रचारात लोकांकडून बेरोजगारी, कौशल्यविकास, शिक्षण व महिला सशक्तीकरण या विषयांवर विचारणा झाली. मायनिंगबाबत थेट कुणी प्रश्न केलेले नाहीत. पण रोजगार संधी कमी असल्याबाबत विचारणा होते. म्हादईचा विषय हा न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणे योग्य नाही. निवडून आल्यानंतर आपण मडगावात कार्यालय उघडणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोककल्याणार्थ काम करण्याचा संकल्प !

लोककल्याणार्थ काम करण्याचा संकल्प आहे,असे पल्लवी धेंपे यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना धेंपे यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाच्या पक्ष श्रेष्ठींनी जो विश्र्वास आपल्यावर दाखवला आहे, त्यास मी कधीही तडा जाऊ देणार नाही. आपल्याला सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य व आशीर्वाद पाहिजेत, जेणेकरुन माझे मनोबल उंचावेल. आपण वीसही मतदारसंघाचा दौरा केला आहे. समाजाच्या सर्व घटकांकडे संपर्क साधला असून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्नपूर्तीस कार्यकर्त्यांनीही खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Migration: आफ्रिकेतून आलेले, होमो प्रजातींमधून विकसित झालेले काही मानव किनाऱ्यावर स्थायिक झाले; कोकणातली स्थलांतरे

Hybrid Car: कार घेण्याचा विचार करताय? 1200 किमी मायलेज असलेल्या 'या' 3 Hybrid Cars वर मिळतेय जबरदस्त सूट

Shravan 2025: श्रावण महिना सुरु होतोय, सर्व मनोकामना पूर्ण होतील! जाणून घ्या तिथी आणि शुभ योग कोणते?

Foreign Nationals Arrested: डिचोलीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 2 परदेशी महिलांना अटक

Crime News: "तुझ्या पतीच्या स्पर्ममध्ये विष, माझ्यासोबत संबंध ठेव" पाद्रीचा उपचाराच्या नावाखाली लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT