Pallavi Dempo Assets: सर्वात श्रीमंत उमेदवार! पल्लवी धेंपे यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती; प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर

Pallavi Dempo Assets: सर्वांत श्रीमंत उमेदवार: दागिने ५.७० कोटींचे; पतीकडे ९९४ कोटींची संपत्ती आहे.
Pallavi Dempo
Pallavi DempoDainik Gomantak

Pallavi Dempo Assets Goa Lok Sabha Election 2024

आतापर्यंत गोव्‍यात झालेल्‍या अनेक निवडणुकांमध्‍ये कोट्यधीश उमेदवार रिंगणात उतरले असले तरी सध्‍याच्‍या दक्षिण गोव्‍यातील भाजप उमेदवार पल्‍लवी धेंपे या सर्वांत श्रीमंत उमेदवार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. त्यांच्याकडे तब्‍बल २५५.४४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तर, त्‍यांचे पती उद्योजक श्रीनिवास धेंपे यांची एकूण मालमत्ता ९९४.८३ कोटी एवढी आहे. या दोन्‍ही मालमत्तांची एकूण बेरीज केल्‍यास तो आकडा १२५० कोटींवर पोहोचतो.

मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पल्लवी यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. आपल्याकडे सुमारे २५५.४४ कोटींची मालमत्ता असल्याचे धेंपे यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. श्रीनिवास धेंपे गोव्यातील प्रसिद्ध उद्योजक आहेत.

भाजपने यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीची उमेदवारी महिला उमेदवार म्हणून पल्लवी धेंपे यांना जाहीर केली आहे. पल्‍लवी धेंपे यांच्‍याविरोधात एकही गुन्‍हेगारी स्वरूपाचा गुन्‍हा नोंद नाही. गोव्यातील प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास धेंपे यांच्या त्‍या पत्नी आहेत. भाजपने यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीची उमेदवारी महिला उमेदवार म्हणून पल्लवी धेंपे यांना जाहीर केली आहे. पल्‍लवी या उद्योगपती असून त्‍यांनी पुण्‍यातील एमआयटीमधून बिझनेस मॅनेजमेंटमध्‍ये पोस्‍ट ग्रॅज्‍युएशन केले आहे.

श्रीनिवास धेंपेंची मालमत्ता

६.५६ कोटी बँक बॅलन्स

७९२.३८ कोटींचे बॉण्ड्स

२४.०५ कोटींची बचत

१७१. ८४ कोटींची अन्य मालमत्ता

पल्लवींकडे २५५ कोटींची मालमत्ता

पल्लवी धेंपे म्हणाल्या की, प्रकल्पांबाबत भाजपची जी भूमिका असेल, तीच भूमिका माझी असेल. भाजपच्या नेतृत्वाने उमेदवारी देऊन दाखवलेला विश्‍‍वास मी सार्थ ठरविणार आहे. जनहितासाठी झटेन. विरोधक टीका करतात, त्यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. सध्‍या फक्त प्रचारावर लक्ष केंद्रित केले आहे.

Pallavi Dempo
Goa CM Pramod Sawant: कर्नाटकात लय जबरा फसले सीएम सावंत; अचानक हॉटेलची लिफ्ट बंद झाल्यानं उडाली भांबेरी

भाजपकडून उमेदवारी दाखल

पल्‍लवी आणि श्रीनिवास धेंपे यांची एकूण स्‍थावर मालमत्ता १०१.४० कोटी आहे. पल्‍लवी यांच्‍या नावावर २८.२० कोटींची तर श्रीनिवास यांच्‍या नावावर ८३.२० कोटींची मालमत्ता आहे. गोव्‍यातील विविध ठिकाणी व्‍यावसायिक मालमत्ता असण्‍याबरोबरच मुंबई, लंडन व दुबईमध्‍येही त्‍यांचे अपार्टमेंटस्‌ आहेत. गोव्‍यासह तामिळनाडू आणि चेन्नईत शेतजमीन आहे.

पल्लवींना २० हजारांचे मताधिक्‍य : ढवळीकर

पल्लवी धेंपे यांना ६० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळणार, असे भाजप नेते सांगत असले तरी मगोचे नेते सुदिन ढवळीकर यांनी मात्र सबुरीने घेताना पल्लवी या २० हजार मताधिक्याने निवडून येतील असे म्‍हटले आहे. मडकई, फोंडा, सावर्डे या मतदारसंघांत भाजप आघाडी घेईल, असेही ते म्‍हणाले.

Pallavi Dempo
CM Pramod Sawant: प्रमोद सावंत यांच्यासह त्यांच्या पत्नीला अटक करा; काँग्रेसनंतर आता आपची मागणी

कोणती आणि किती संपत्ती?

बँक खात्यांमध्‍ये

९.९१ कोटी

वाहने

२.५४ कोटींची

सोने

५.७० कोटींचे

बाँड्स

२१७.११ कोटींचे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com