Goa Congress: Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

निकाल जाहीर झाल्यावर भाजपचा अहंकार नष्ट होईल: दिगंबर कामत

गोव्यात आता गोवा प्रदेश काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांच्याच युतीचे सरकार स्थापन होणार; कामत

दैनिक गोमन्तक

Goa Congress: विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला पक्षश्रेष्ठींनी खूप सहकार्य केले. राहुल गांधी, पी चिदंबरम यांनी गोव्यात उमेदवारांचा प्रचार करून गोव्याच्या जनतेला संबोधित केले. त्याचबरोबर पक्षातून दिनेश गुंडू राव, गिरीश चोडणकर हे तर पक्षाचा खूप मोठा भाग आहेत. त्यामुळे या सगळ्यांचे आणि विशेष करून गोव्याच्या जनतेचे मी मनापासून आभार मानतो. गोव्यातल्या जनतेने आता हे पक्के ठरवले आहे की, गोव्याला काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे कारण त्यांना आमच्या कर्तुत्वावर आणि आमच्या तत्त्वांवर विश्वास आहे. त्यामुळे त्यांनी हे ठरवले आहे की गोव्यात आता गोवा प्रदेश काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टी यांच्याच युतीचे सरकार स्थापन होणार आहे, असे मत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत (Digambar Kamat) यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, म्हणूनच या निवडणुकीत आम्हाला जास्त जागा मिळाल्या तरी आम्हाला याचे आश्चर्य वाटणार नाही. पण दुसरीकडे जे लोक 22 पैकी 22 जागा आम्हाला मिळणारच हा अहंकार घेऊन आहेत, त्यांचा अहंकार 10 मार्चला जो निकाल येईल त्यावेळी नष्ट झालेला असेल. कारण सध्या त्यांचे पाय जमिनीवर नाहीत पण निकालामुळे ते धाडकन तोंडावर आपटणार आहेत, अशी सडकून टीका कामत यांनी यावेळी केली.

ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी मतदानादिवशी आपली सेवा बजावली आहे, ते सरकारी कर्मचारी आत्ताच्या सरकारच्या दबावात खाली असल्याचे आमच्या निदर्शनास आले. सध्याचे सरकार या कर्मचाऱ्यांना स्वतःला मत देण्यासाठी दबाव आणत आहे; पण मी या सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन करू इच्छितो की कोणाच्याही दबावाखाली न येता, तुमच्या मनातील उमेदवारालाच मत द्या, असे मत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी व्यक्त केले.

यानंतर गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई (Vijai Sardesai) म्हणाले की, आपण सर्व गोवेकरांनी एकत्र येऊन या भाजप सरकारपासून गोवा मुक्त करण्याची गरज आहे. त्यासाठी ज्यांनी ज्यांनी मतदान केले त्यांचा मी आभारी आहे.

काल झालेल्या मतदानामध्ये मोठ्या संख्येने आपला मतदानाचा हक्क बजाववल्याबद्दल आणि गोव्याच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिल्याबद्दल मी सर्व गोवेकरांचे आणि मतदारांचे आभार मानतो. मला खात्री आहे की गोव्याची जनता काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड पार्टीच्या युतीला नक्कीच संधी देईल. काँग्रेस गोव्यातील सर्व घटकांसाठी, महिलांसाठी, अनुसुचित जाती-जमातींसाठी, कर्मचाऱ्यांसाठी, तरुणांसाठी अशा एकूण सर्वच घटकांसाठी पुढे येऊन काम करणार आहे. मला सांगावेसे वाटते की, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मिडियाने खूप मोठी भूमिका बजावली आहे. त्यांनी स्पष्ट राहून सर्व पक्षांना समान न्याय देत त्यांचे म्हणणे जनतेसमोर मांडले. बर्‍याचदा असे होते की, सत्ताधारी पक्ष हे मीडियावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात; पण गोव्यातले पत्रकार हे अत्यंत पारदर्शक आहेत. म्हणूनच आमच्या युतीचेच सरकार येणार यात वाद नाही, असा विश्वास दिनेश गुंडू राव यांनी यावेळी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT