BJP  Gomantak Digital Team
गोवा

Goa Ganesh Chaturthi 2023: विसर्जनस्थळांची करणार स्वच्छता; 2 ऑक्टोबरचा मुहूर्त

भाजपतर्फे सेवा पंधरवड्यानिमित्ताने आयोजन

दैनिक गोमन्तक

Goa BJP: गणेश विसर्जन केल्यानंतर विसर्जनस्थळी निर्माण होणारा कचरा भाजपचे कार्यकर्ते २ ऑक्टोबर रोजी साफ करणार आहेत. २ ऑक्टोबर रोजी राज्यभरात भाजप सेवा पंधरवड्यानिमित्ताने स्वच्छता मोहीम राबवणार आहे.

त्यावेळी या ठिकाणांच्या साफसफाईवर भर देण्यात येईल, असे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष समीर मांद्रेकर यांनी गुरुवारी (ता.१४) येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

त्यांनी माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर, सुभाष मळीक, राजसिंग राणे, गिरीश उस्कैकर यांच्या उपस्थितीत सेवा पंधरवड्यात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

रविवार, १७ रोजी दक्षिण गोवा भाजप कार्यालयात मडगाव येथे सकाळी १० ते दुपारी १ वा. यावेळेत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर घेण्यात येईल.

त्याच दिवशी मडगावच्या व्हिक्टर इस्पितळात भाजपचे रक्तदान शिबिर सकाळी ९ ते दुपारी १ वा. यावेळेत होईल. म्हापशातील रक्तदान शिबिर भाजपच्या उत्तर गोवा कार्यालयात याचवेळी होईल.

२५ सप्टेंबर रोजी मतदारसंघातील सर्व शक्ती केंद्रांवर दीनदयाळ उपाध्याय जयंतीचा कार्यक्रम होणार आहे. प्रतिमेचे पूजन व इतर उपक्रम यावेळी राबवण्यात येतील. रविवार, १७ रोजी आसगाव येथील महिला आश्रमात फळवाटप सकाळी १० वाजता केले जाणार आहे.

हे कार्यक्रम सर्वांसाठी खुले आहेत. भाजपची विचारसरणी मानणारे नागरिकही यात सहभागी होऊ शकतील, असे यावेळी सांगण्यात आले.

२६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत मतदान केंद्र समिती सशक्तीकरण मोहीम राबवण्यात येईल. या काळात ७० नेत्यांकडून या समित्यांची पडताळणी करण्यात येणार आहे.

नेहमीच जिंकण्याच्या तयारीत

भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे का, असे विचारल्यावर मतदान केंद्र समित्यांची पडताळणी हा त्याचाच भाग असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

लोकसभा निवडणुकीची अशी वेगळी तयारी नसते. भाजप सातत्याने संघटनात्मक कामे करत असतो. त्यामुळे निवडणूक कधीही घेतली तरी भाजप ती लढवण्याच्या आणि जिंकण्याच्या तयारीत असतो, असे मळीक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

Goa Weather: अखेर पणजीत पावसाचे अर्धशतक! राज्यात पावसाचा जोर मंदावला; वाळपईत सर्वाधिक 107 इंच, पणजीत सर्वात कमी 50 इंच

SCROLL FOR NEXT