J. P. Nadda in Goa

 

Dainik Gomantak

गोवा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा गोव्यात दाखल

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत.

दैनिक गोमन्तक

वास्को : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवार आणि बुधवार अशा दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आले आहेत. नड्डा यांचे दाबोळी विमानतळावर गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांनी स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी शेकडो कार्यकर्ते विमानतळावर उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूक तयारीला वेग दिला आहे. भाजपने निवडणूक तयारीला गती दिली असली, तर पक्षातील अंतर्गत वाद वाढण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर पक्षाने माजी आमदारांना पक्षात प्रवेश दिल्याने त्यांच्या मतदारसंघातून चलबिचल सुरू झाली आहे. त्यातच काँग्रेसने (Congress) सेक्स स्कँडलमध्ये मंत्री मिलिंद नाईक असल्याचे जाहीर करून त्यासंदर्भातील पुरावेही बाहेर आणल्याने आणि त्यानंतर नाईक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने भाजप (BJP) कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकरभरतीत मंत्री दीपक प्रभु पाऊस्कर यांनी 70 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचेच आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या खात्यातील नोकरभरतीच स्थगित केली. त्यामुळे नियुक्तीपत्रे मिळालेले उमेदवार आणि पालक संतप्त झाले असून, तेही सरकारला दोष देत आहेत. तसेच वास्कोचे आमदार कार्लोस आल्मेदा यांनी आमदारकीचा राजीनामा दिला, तसेच भाजपच्या (BJP) प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याने वास्को मतदार संघात संभ्रम निर्माण झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: म्हापशातील कोमुनिदाद प्रशासक इमारत कमकुवत, शासनाकडून दखल नाही; कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका

Deported! बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधु बँकॉकमधून डिपोर्ट; दिल्लीतून गोव्यात होणार दाखल, व्हिडिओ आला समोर Watch

अनधिकृत आस्थापन पाडण्याचे आदेश, तरी अंमलबजावणी नाही! 'कारवाई न करण्याचा खेळ' कधी थांबणार?- संपादकीय

विरोधी पक्षांचे नेते 'नर्व्हस' की 'ओवरकॉन्फिडेंट'? स्वार्थासाठी युती तोडली, भाजपला आयती संधी!

Horoscope: नशीब चमकणार! आजचा दिवस 'या' 3 राशींसाठी ठरणार अतिशय शुभ; कारण... आदित्य-मंगल योग

SCROLL FOR NEXT