भाजपकडून रोजगाराबाबत फसवणूक; फोंड्यात मगोने काढला निषेध मोर्चा

दहा हजार नोकऱ्या जाहीर करणाऱ्या भाजप सरकारने फोंड्यातील युवा वर्गाला किती रोजगार दिला हे आधी
 job scams

job scams

Dainik Goamnatk
Published on
Updated on

फोंडा : सरकारने युवकांना दहा हजार नोकऱ्या देण्याचे अभिवचन देऊनही युवा वर्गाची फसवणूक केली असून या दहा हजारातील किती नोकऱ्या फोंड्यातील युवकांना मिळाल्या हे सरकारने जाहीर करावे, असे आव्हान मगो पक्षाचे फोंड्यातील नेते डॉ. केतन भाटीकर यांनी दिले आहे. फोंड्यात सोमवारी मगो पक्षातर्फे सरकारविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी केतन भाटीकर यांच्यासमवेत मगो पक्षाचे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

केतन भाटीकर म्हणाले, फोंडा मतदारसंघात मूलभूत सुविधांची वानवा आहे. सरकारला फोंडा मतदारसंघाचे काहीच पडलेले नाही. फोंड्यात सध्या आमदारच नाही. त्यामुळे लोकांनी जायचे कुणाकडे हा खरा प्रश्‍न आहे. भाजप सरकारने सध्या सत्ता बळकावण्यासाठी ज्या तऱ्हेने चाली चालवल्या आहेत, त्या गोमंतकीयांच्या मूळावर येणाऱ्या ठरणार आहे. एककाळ नीतीच्या बाता मारणाऱ्या भाजपला आता नैतिकतेची चाड राहिलेली नाही.

<div class="paragraphs"><p> job<em> </em>scams  </p></div>
रेजिनाल्डही गेले, कोण बाकी राहिले?

रोजगाराच्याबाबतीत भाजप सरकार (BJP government) सपशेल अपयशी ठरले असून दहा हजार नोकऱ्या जाहीर करणाऱ्या भाजप सरकारने फोंड्यातील युवा वर्गाला किती रोजगार (Employment) दिला हे आधी स्पष्ट करावे, फोंड्यातील उपजिल्हा इस्पितळात अजून सोयीसुविधा का उपलब्ध केल्या जात नाहीत, असे विचारून रुग्णांना सध्या वेठीस धरले जात आहे, असे केतन भाटीकर म्हणाले. यावेळी फोंडा ते बेतोडापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

<div class="paragraphs"><p> job<em> </em>scams  </p></div>
तपासकामात गोवा पोलिस देशात सर्वोत्तम; कुडचडे, वेर्णा, कळंगुटचा गौरव

दरम्यान, केतन भाटीकर यांच्या वाढदिनानिमित्त फोंडा मगो पक्षातर्फे सार्थक फाऊंडेशन ऑफ गोवा व गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रक्तपेढी बॅंक आयोजित रक्तदान शिबिर सोमवारी सकाळी आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला मगो फोंडा नेते डॉ. केतन भाटीकर, कुर्टी खांडेपार पंचायती सरपंच भिका केरकर, फोंडा मगो पक्षाचे केंद्रीय समितीचे अनिल नाईक, मगो नेते अभय प्रभू, नगरसेविका गीताली तळावलीकर, अर्चना नाईक डांगी, सीमा फर्नांडिस, अमिना नाईक उपस्थित होते. डॉ. केतन भाटीकर यांच्या वाढदिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. असून त्याला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Coarse Farming Affected by Rain
Vijay Sardesai Goa First Alliance
 Shappora River water Goa
Marna Siolim Burglary Attempt
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com