Sadanand Shet Tanavade Dainik Gomantak
गोवा

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच जिंकणार, तानावडेंना विश्वास

विधानसभेनंतर आता भाजपचा मोर्चा पंचायत आणि लोकसभा निवडणुकीकडे

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवल्यानंतर आपला मोर्चा आता लोकसभा निवडणुकांकडे वळवल्याचं चित्र आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपच जिंकणार असा विश्वास गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी केला आहे. तसंच आगामी पंचायत निवडणुकीत भाजपलाच लोक पसंती देतील असंही तानावडे म्हणाले आहेत.

गोव्यात विधानसभा निकालाला आठवडाभर उलटूनही अजूनही सत्तास्थापनेचा दावा करण्यात आलेला नाही. मात्र ही स्थिती फक्त गोव्यातच नाही तर भाजप जिंकलेल्या चारही राज्यात असल्याचं सदानंद शेट तानावडेंनी (Sadanand Shet Tanavade) स्पष्ट केलं. तसंच होळीपर्यंत सरकार स्थापन होणार नसल्याचीही त्यांनी सांगितलं. 21 किंवा 22 मार्चला केंद्रीय निरीक्षक गोव्यात दाखल होतील आणि सत्तास्थापनेच्या दाव्याबद्दल निर्णय घेतील असं तानावडे म्हणाले. मात्र मगोपला सोबत घेणार की नाही यावर त्यांनी सूचक मौन बाळगल्याचं चित्र आहे.

गोव्यात भाजपमध्ये (BJP) कोणतेही मतभेद नाहीत. मात्र मुख्यमंत्रीपदाचं नाव केंद्रीय निरीक्षकच जाहीर करतील, असं तानावडेंनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रमोद सावंत आणि विश्वजीत राणेंमध्ये (Vishwajit Rane) मुख्यमंत्री पदावरुन वातावरण तापल्याची चर्चा होती. मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडेंनी या गोष्टीचा साफ शब्दात इन्कार केला आहे. दरम्यान विश्वजीत राणेंना मुख्यमंत्रीपदाबाबत विचारलं असता त्यांनी पत्रकारांवरच आगपाखड केल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरुन कुठेतरी भाजपच्या गोटात नाराजी असल्याचं चित्र दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'रामा'च्या न्यायासाठी पणजीत काढलेला मोर्चा अवैध असल्याचा आरोप; युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांच्यासह 450 जणांविरोधात गुन्हा

Sanguem: ..अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली! सांगेतील माय-लेकीला मिळाला हक्काचा निवारा; मंत्री फळदेसाईंचा पुढाकार

Goa Coconut Price: नारळ अजून महागच! टोमॅटो, कांदाही भडकला; वाचा ताजे दर

Goa News Live: ओपा प्रकल्पातील पंप अखेर सुरु, राजधानीला मिळणार पाणी

Zilla Panchayat Election: गोवा फॉरवर्ड, ‘आप’कडून जोर, काँग्रेस स्‍वस्‍थच! जिल्‍हा पंचायत निवडणूक; सरदेसाईंकडून उमेदवार चाचपणी

SCROLL FOR NEXT