मुख्यमंत्रीपदाच्या प्रश्नावर विश्वजीत राणेंचा पत्रकारांवर संताप, म्हणाले..

मुख्यमंत्रीपदी सावंतांचे नाव अंतिम; पर्रिकांरांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात राणेंची नाराजी स्पष्ट
Vishwajeet Rane
Vishwajeet RaneDainik Gomantak

गोवा: राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठी डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या नावावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाला आहे. याबाबत विश्वजीत राणे यांना पत्रकारांनी प्रश्न केला असता, ते पत्रकारांवर भडकले "विश्‍वजित राणे म्हणाले तुम्ही असले फालतू प्रश्न मला विचारू नका मिडीयाचे हे कामच असतं भडकवायचं, मी माझ्या नेत्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आलो आहे; हे असले विषय तुम्ही केंद्रीय नेतृत्वाला विचारा असे म्हणात त्यांनी आपली तीव्र नाराजी उघडपणे मांडली. विश्‍वजित राणे नाराज असल्याची चर्चा सर्वत्र आहे. (vishwajeet Rane displeasure is clear in tribute program of manohar Parrikar about CM Candidate)

Vishwajeet Rane
गोव्यातील शिक्षकांच्या सुट्ट्या बोर्डाने केल्या रद्द

विश्वजीत राणेंच्या संभाव्य बंडाची चर्चा सुरुच

गोव्याचे मुख्यमंत्री (CM) कोण होणार या चर्चेवर याआधीच पडदा पडला असला तरीही विश्वजीत राणेंच्या (Vishwajeet Rane) संभाव्य बंडाची चर्चा सुरुच आहे. गोव्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचंच नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. केंद्रीय नेतृत्वाशी सल्लामसलत केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असं तानावडेंनी स्पष्ट केलं आहे.

भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन कोणतेही मतभेद नाही

गोव्यात विधानसभा निवडणुकीचे (Goa Assembly Election 2022) निकाल लागून आठवडा उलटला तरीही अजून सत्तास्थापनेचा दावा भाजपने (Goa BJP) केलेला नाही. गोव्यात मुख्यमंत्रीपदावरुन मतभेद असल्याचीही चर्चा सुरु आहे. विद्यमान मुख्यमंत्र्यांसमोर विश्वजीत राणेंनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याचं बोललं जात आहे. आता गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडेंनी भाजपमध्ये कोणतेही मतभेद नसून सर्व एक आहेत, असं विधान केलं आहे. तसंच मुख्यमंत्रीपदावरुन कोणताही संभ्रम नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com