Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

भाजप खाणी सुरू करणार नाहीच; सुदिन ढवळीकर

जनतेने आश्‍वासनांना बळी न पडण्‍याचे आवाहन

दैनिक गोमन्तक

पणजी : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्‍वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय नेते प्रचारात अनेक आश्‍वासने देतील, मात्र या आश्‍वासनांना जनतेने भुलून जाऊ नये. गेली दहा वर्षे राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकार असतानाही तो त्यांना का सुरू करता आला नाही, असा प्रश्‍न मगोचे (MGP) नेते सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी केला. या सरकारला खाण व्यवसाय सुरू करायचा नाही व भाजप सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास तो आणखी दहा वर्षे तरी शक्य नाही, अशी टीका त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

काल गोव्यातील जनतेशी संवाद साधताना तसेच सभेत केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी लोकांना राज्यातील खाण व्यवसाय लवकरच सुरू केला जाईल असे आश्‍वासन दिले आहे, मात्र 2012 मध्ये खाणी बंद करण्यामागील कारण भाजपने स्पष्‍ट करावे. ‘डंप’च्या नावाने हा खाण व्यवसाय सुरू करणार असल्याचे सांगितले जात असले तरी कायदेशीर खनिज उत्खनन व्यवसाय आणखी दहा वर्षे तरी सुरू होणे शक्य नाही.

अमित शहा यांनी सावर्डे मतदारसंघात घरोघर प्रचारात भाग घेतला. खाणपट्टा असलेल्या या मतदारसंघात मगोचा प्रबळ उमेदवार आहे. ज्या उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली आहे त्याचे नाव एसआयटीच्या चौकशीत गोवले गेले आहे. त्यामुळेच भाजपच्या (BJP) राष्ट्रीय नेत्यांवर घरोघर फिरण्याची पाळी आली आहे, अशी टीका ढवळीकर यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी अफवांवर दिलं स्पष्ट उत्तर; 'हिटमॅन'बाबतचा संभ्रम दूर

Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

Pakistan Suicide Attack: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण आत्मघाती हल्ला; 12 सैनिकांसह 15 जण ठार 

Horoscope: एकादशीचा शुभ मुहूर्त! 'या' राशींचे नशीब उजळणार; आर्थिक लाभासह करिअरमध्ये यशाचे संकेत

Goa Youth Protest: परवानगी नाकारली; निदर्शने केलीच, म्हापशातील ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या आंदोलनाला उत्स्फूर्त पाठिंबा

SCROLL FOR NEXT