Goa Assembly Election: केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री श्रीमती दर्षना जरदोस यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केलेले काँग्रेसचे नेते तथा माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत व त्याचे कार्यकर्ते. Dainik Gomantak
गोवा

विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यातून मोठा इतिहास घडवणार: दर्शना जरदोस

भारतीय जनता पक्ष विकास कामांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. मोदी सरकारचे नेतृत्व म्हणजे देशसेवाच: दर्शना जरदोस

दैनिक गोमन्तक

वास्को: भारतीय जनता पक्ष विकास कामांना प्राधान्य देणारा पक्ष आहे. मोदी सरकारचे नेतृत्व म्हणजे देशसेवा. गोव्यातील विकास येथील जनतेचा असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप येथून मोठा इतिहास घडवणार असल्याची माहिती केंद्रीय राज्य रेल्वे व वस्त्र उद्योग मंत्री श्रीमती दर्शना जरदोस यांनी दिली.(BJP will make big history in Goa Assembly Elections)

मुरगाव नगरपालिकेचे Mormugao Municipality माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन वास्को भारतीय जनता पक्षात Goa BJP प्रवेश करून येथील भाजपचे उमेदवार कृष्णा साळकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यावेळी नंदादीप राऊत यांच्या समवेत त्यांच्या नगरसेविका पत्नी प्रिया राऊत, कार्यकर्ते तुषार नाईक, सिद्धेश नाईक, रुपेश कोरगांवकर, चंदन मडकईकर, सचित नाईक, तुळशीदास कुकळेकर, तेजस नाईक, आशिष नाईक, रुपेश गाड, शंकर तांडेल, सनी मोरुडकर, प्रणित पी. चंदन कदम, भरत सावंत, तनवीर नाईक, विपुल नाईक व इतर कार्यकर्त्यांनी नंदादीप राऊत यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी वास्कोचे Vasco भाजप उमेदवार कृष्णा साळकर, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक, नगरसेवक अमय चोपडेकर, विनोद किनळेकर, गिरीश बोरकर, शमी साळकर माजी नगरसेविका रिमा सोनुर्लेकर, रोजना बोरकर, प्रशांत नार्वेकर, जयंत जाधव व इतर भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती दर्शना यांनी सांगितलं की केंद्र सरकारने गोव्याला विकासापासून कधीच दूर ठेवले नाही मुख्यमंत्री सावंत यांना सांगितले की मोदी यांनी सदैव सहकार्य करून गोव्याचा चौफेर विकास केला आहे. गोव्यात भाजप पक्ष 22 पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणून आकडा 25 पर्यंत पोहोचणार असल्याची माहिती पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

वास्कोचे भाजप उमेदवार साळकर यांनी सांगितले की माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत, नगरसेविका प्रिया राऊत व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप मध्ये प्रवेश करून माझे हात बळकट केले असल्याची माहिती दिली. माजी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांनी सांगितले की गोव्याचा विकास साधण्यात भाजप योग्य आहे. मुख्यमंत्री सावंत CM Pramod Sawant यांना पुन्हा एकदा गोव्याचे कार्यभार संभाळण्यासाठी भाजपला मजबूत करणे माझे एकमेव ध्येय असून त्यात मी यशस्वी होण्यासाठी साळकर यांना पाठिंबा जाहीर केला आहे. वास्को भाजप अवश्य बाजी मारणार असल्याची माहिती शेवटी राऊत यांनी दिली. या प्रसंगी दीपक नाईक व इतरांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत जाधव यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT