Cm pramod sawant Dainik Gomantak
गोवा

Goa News : २०२७ च्या विधानसभेत भाजपच अजिंक्य ठरणार : मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Cm Pramod Sawant : उत्तरेबरोबरच दक्षिणेत ११ मतदारसंघात भाजपचे वर्चस्व

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा कार्यकर्त्यांच्या बळावरच भाजपाने उत्तर गोवा मतदारसंघ सहाव्यांदा जिंकला, तर किंचित फरकाने दक्षिण गोवा पक्षाच्या हातून निसटला. तसेच भाजपाने इंडिया आघाडीच्या उमेदवारास उत्तरेत १६ मतदारसंघात हरवले. तर हळदोणा व सांतआंद्रे या मतदारसंघातून अनुक्रमे ७० व ८० मतांनी पराभूत झाला.

तर दक्षिणेत ११ विधानसभा मतदारसंघात भाजपाने वर्चस्व दाखविले. त्यामुळे ही गोळाबेरीज केल्यास आगामी २०२७च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा २७ पेक्षा अधिक मतदारसंघातून विजयी होईल, असा आत्मविश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यापूर्वी भाजपा कोअर समितीची बैठक झाली. पक्षसंघटनेबाबत व आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे समजते.

बुधवारी (ता.१०) सायंकाळी म्हापशात मतदार अभिनंदन सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मंत्री रोहन खंवटे, मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार केदार नाईक, प्रेमेंद्र शेट, दिव्या राणे, दिलायला लोबो व इतर लोकप्रतिनिधी तसेच भाजपाचे पदाधिकारी व्यासपीठावर हजर होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, उत्तरेतून भाऊंचा पराभव करण्यासाठी अनेक संघटना निवडणूक काळात सक्रिय झालेल्या. अनेकांनी विविध व्यासपीठावरुन भाजपाच्या विरोधात प्रचार केला. आपल्याजवळ सर्व नावांसहीत यादी आहे. असे असले तरी भाजपा कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही बाजी मारली.

‘इंडी’ला कोपरखळी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या विकासकामांवर लोकांनी पुन्हा विश्वास दाखविला. काँग्रेसने ५४३ पैकी केवळ ९९ जागांवर विजय मिळविला. परंतु, काँग्रेस १०० पैकी ९९ जागा मिळविल्यासारखे सर्वत्र पेढे वाटत फिरताहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी तसेच इंडिया आघाडीच्या मानसिकतेवर कोपरखळी लगावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT