Goa BJP Dainik Gomantak
गोवा

नरेंद्र मोदींच्या सुशासनामुळेच भाजपला योजना राबवता आल्या : सभापती रमेश तवडकर

केंद्रातील मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप गोवा अनुसूचित जमात मोर्चातर्फे अनुसूचित जमाती कल्याण संमेलन बार्से येथील सिद्धेश्वर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

दैनिक गोमन्तक

केपे : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगले सुशासन दिल्यानेच भाजपा सरकारला 164 योजना राबवता आल्या. त्यांनी जे दिले आहे त्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवायला हवी, असे आवाहन सभापती रमेश तवडकर यांनी केले.

केंद्रातील मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भाजप गोवा अनुसूचित जमात मोर्चातर्फे अनुसूचित जमाती कल्याण संमेलन बार्से येथील सिद्धेश्वर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई , माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर, जिल्हा पंचायत सदस्य खुशाली वेळीप व संजना वेळीप, उपसरपंच लक्ष्मिण गावकर, पंच सदस्य सविता वेळीप, प्रजिता वेळीप, भाजपा गोवा प्रदेश अनुसूचित जमात मोर्चा अध्यक्ष प्रभाकर गावकर, मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, केपे अनुसूचित जमात मोर्चा अध्यक्ष संदेश वेळीप व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखंड समृध्द भारत आज जागतिक महासत्तेकडे वाटचाल करीत आहे. देशभरातील कार्यकर्ते देशवासी आज भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून तीच आमची खरी शक्ती आहे. मोदीजींनी जागतिक पातळीवर देशाचा गौरव वाढवलेला असून, कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून आज प्रत्येक घरात कोणत्या ना कोणत्या कारणाने योजना पाठविल्या, असे समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले.

पुढे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आजवर देशात प्रलंबित असलेले राम मंदिर, तिहेरी तलाक, कलम 360 या सारखे मुद्दे तडीला लावले. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 11व्या हप्त्याचे पैसे थेट बँक खात्यात जमा केले आहे. कल्याणकारी योजना प्रत्येकापर्यंत पोचवण्यात सरकार यशस्वी ठरले.

दरम्यान, अनुसूचित जमात समाजातील दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांच्या शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन केपे अनुसूचित जमात मोर्चा अध्यक्ष संदेश वेळीप यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Tension: शांतता चर्चा फिस्कटली, पाकड्यांचा अफगाणिस्तावर पुन्हा हल्ला, सीमा सुरक्षारक्षकांवर केला अंदाधुंद गोळीबार VIDOE

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

SCROLL FOR NEXT