

मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फलंदाजांनी घालीन लोटांगण केल्यानंतर टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ अस्तित्व टिकवण्याच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यातच वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेवर शतकी धावांनी विजय मिळवल्यामुळे भारताची उपांत्य फेरीची वाट अधिकच बिकट झाली आहे.
पुढच्या शिल्लक असलेल्या सामन्यांत काय होईल यापेक्षा उद्या, गुरुवारी दुपारी ४ वाजता सुरू होणारा दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघ तीनपैकी एकच सुपर-८ फेरीतील सामना खेळला आहे.
अजून दोन सामने शिल्लक आहेत, पण आफ्रिकेविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे आणि वेस्ट इंडीजच्याही दणदणीत विजयाने भारतासाठी सर्व समीकरणे बदलली आहेत. भारतीय संघ उपांत्य फेरीत जाणार का? याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर आणि भारतीय क्रिकेट वर्तुळात सुरू आहे.
गटातून दोनच संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांच्या नावावर एकेक विजय आहे, तर भारत आणि झिम्बाब्वे अजून भोपळ्यातच आहेत.
समजा गुरुवारी दुपारी वेस्ट इंडीजने दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला, तर १ मार्च रोजी दुपारी होणाऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागेल (पण हे सध्याच्या स्थितीत कठीण आहे.) त्यानंतर भारताला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडीजवर विजय मिळवाच लागेल. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका स्पर्घेच्या बाहेर जाईल आणि वेस्ट इंडीज, भारत उपांत्य फेरीत जातील. भारताचा झिम्बाब्वेविरुद्धचा सामना चेन्नईत गुरुवारी होत आहे तर वेस्ट इंडीजविरुद्धचा सामना १ मार्च रोजी कोलकतामध्ये नियोजित आहे.
गुरुवारी दोन सामने होत आहेत. त्यातील पहिला सामना अहमदाबादमध्ये दुपारी ४ वाजता दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीजमध्ये आहे. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता चेन्नईत भारत-झिम्बाब्वे सामना होणार आहे.
दुपारच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला तरच भारताचे आव्हान कायम राहील अन्यथा भारताने झिम्बाब्वेवर विजय मिळवला तरी काही फरक पडणार नाही.
या समीकरणानुसार झिम्बाब्वेविरुद्धचा सामना होण्याअगोदरच दक्षिण आफ्रिकेचा उपांत्य प्रवेश निश्चित होईल. आफ्रिकेने विंडीजवर विजय मिळवल्यानंतरही भारताने गुरुवारीच होणाऱ्या सामन्यात झिम्बाब्वेला आणि १ मार्च रोजी होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक असेल.
शक्यता ः १
वेस्ट इंडीज वि. आफ्रिका (आफ्रिकेचा विजय)
भारत वि. झिम्बाब्वे
(भारताचा विजय)
आफ्रिका वि. झिम्बाब्वे (काहीही निकाल लागो)
भारत वि. वेस्ट इंडीज
(भारताचा विजय)
(भारत आणि आफ्रिका
उपांत्य फेरीत)
शक्यता ः २
वेस्ट इंडीज वि. आफ्रिका
(वेस्ट इंडीजचा विजय)
भारत वि. झिम्बाब्वे
(भारताचा विजय)
दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे (झिम्बाब्वेचा विजय)
भारत वि. झिम्बाब्वे
(भारताचा विजय)
(भारत आणि वेस्ट इंडीज
उपांत्य फेरीत)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.