Yuri Alemao Dainik Gomantak
गोवा

Yuri Alemao: दक्षिण गोव्यावर भाजप घेतेय सूड, दाबोळी विमानतळ ‘घोस्ट एअरपोर्ट’

Dabolim Airport: एरोफ्लोटने आपली विमानसेवा मोपा विमानतळावर हलविण्याच्या केलेल्या घोषणेवर आलेमाव यांनी प्रतिक्रिया दिली

गोमन्तक डिजिटल टीम

‘एरोफ्लोट’ने दाबोळी विमानतळावरून आपल्या सर्व विमानसेवा मोपा येथे हलवण्याची घोषणा केली आहे. असंवेदनशील भाजप सरकारचा दक्षिण गोव्याला हा आणखी एक धक्का आहे. दक्षिण गोव्याची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याने दाबोळी विमानतळ लवकरच ‘घोस्ट एअरपोर्ट’ बनणार आहे.

दक्षिण गोव्यावर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा भाजपकडून सूड घेतला जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यापुढे केवळ आश्वासने देत राहणार की कृती करणार, असा सवाल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

एरोफ्लोट एअरलाइन्सने आपली विमानसेवा मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलविण्याच्या केलेल्या घोषणेवर आलेमाव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री सावंत यांनी ताबडतोब दक्षिण गोव्यातील सर्व निवडून आलेले आमदार आणि खासदार तसेच सर्व संबंधित प्राधिकरणे आणि भागधारकांची बैठक बोलवावी, त्याचबरोबर दाबोळी विमानतळ सुरू रहावे यासाठी शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे घेऊन जावे, अशी मागणीही आलेमाव यांनी केली.

कतार एअरवेजने आपली सेवा मोपाला हलविली, तेव्हाच येथील सर्व सेवा मोपाला जातील, असे सूचित केले होते. दक्षिण गोव्यात भाजपला राजकीय जनाधार नसल्यानेच दाबोळी विमानतळाच्या झालेल्या नुकसानीकडे हे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. दक्षिण गोव्याचे लोक भाजपच्या धोरणांना पाठिंबा देत नसल्यामुळेच दक्षिण गोव्याचे नुकसान व्हावे अशी भाजपवाल्यांची इच्छा असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे.

‘सरकारची बघ्याची भूमिका’

जर सरकारने दाबोळी विमानतळ सुरू राहण्यासाठी सक्रिय पावले उचलली नाहीत, तर हे विमानतळ ‘घोस्ट एअरपोर्ट’ होईल, असा इशारा आपण २०२२ मध्येच सरकारला दिला होता. दुर्दैवाने भाजप सरकारने त्यानंतर काहीही केले नाही. एकामागून एक विमान कंपन्या आपल्या विमानसेवा मोपाला हलवित असताना सरकार बघ्याची भूमिका घेत आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics:"सकाळी येतो सांगून तुकाराम आलाच नाही!", RGP प्रमुखांनी काँग्रेसला पुन्हा टाळले? युतीचा 'सस्पेन्स' वाढला

Goa Nightclub Fire: हडफडे नाईट क्लब दुर्घटनेप्रकरणी मोठी कारवाई: चार व्यवस्थापक अटकेत, मालकाचीही चौकशी होणार

Gautam Gambhir: "ते दोघे बऱ्याच काळापासून..." मालिका जिंकल्यानंतर गौतम गंभीर 'रो-को'बाबत काय म्हणाला?

Goa Live News: 'युतीच्या चर्चेसाठी सकाळपासून वाट पाहिली, पण प्रतिसाद नाही'; आरजीपीवर काँग्रेस नेत्यांचा आरोप

Goa Nightclub Fire: "भाजप सरकार हाय हाय..." परवाना नसतानाही नाईट क्लब सुरू कसा? विरोधक आक्रमक! VIDEO

SCROLL FOR NEXT