Yuri Alemao: मोदी ‘सीएम’ना म्हादईवर चर्चेला वेळ देत ​​नाहीत!

Goa Congress: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा उपरोधिक टोला
Goa Congress: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा उपरोधिक टोला
Yuri AlemaoDainik Gomantak

कर्नाटक काँग्रेस सरकारच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन कळसा-भंडुरा प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांना सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन कळसा-भंडुरा प्रकल्पाचा डीपीआर मागे घेण्याची मागणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट मागत आहेत; पण त्यांना ते वेळ देत नाहीत, असा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लगावला आहे.

कर्नाटक सरकारच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन कळसा-भंडुरा प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणी केली, यावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना चिमटा काढला आहे.

कळसा-भंडुरा प्रकल्पाच्या डीपीआरला केंद्र सरकारने दिलेली मंजुरी मागे घेण्यास राज्य सरकारला आलेल्या अपयशाबद्दल आलेमाव यांनी फटकारले आहे.

Goa Congress: विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा उपरोधिक टोला
PM Modi: ‘’मोदींची तिसरी टर्म आर्थिक विकासाचे नवे युग सुरु करण्यासाठी...’’; इंडिया फोरमच्या संस्थापकांनी व्यक्त केला विश्वास

युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

म्हादई प्रश्नावर गोव्याचे हित जपण्यासाठी सक्रिय पावले उचलण्यात गोवा सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. कर्नाटकात भाजपला राजकीय फायदा मिळवून देण्यासाठी गोव्यातील भाजप सरकारने आमची जीवनदायिनी आई म्हादईचा सौदा केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com