Viresh Borkar news Dainik Gomantak
गोवा

Illegal Constructions: "भाजप सरकार बाहेरच्या लोकांचे समर्थक" बांबोळीतील वस्तीवरून विरेश बोरकरांचा हल्लाबोल

illegal encroachment Goa: या प्रकरणाची लेखी तक्रर देऊन सुद्धा अद्याप काही कारवाई केली गेली नसल्याचं विरेश बोरकर माध्यमांशी बोलताना म्हणालेत

Akshata Chhatre

पणजी: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोव्यातील बेकायदेशीर घरं पाडण्याचं काम ठिकठिकाणी सुरु आहे, मात्र बांबोळी येथील मिलिटरी कॅम्पच्या बाजूला असलेली वस्ती कोणीही पाडण्याचं नाव घेत नसल्याचा आरोप रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाचे नेते आणि सेंट आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी केलाय. या प्रकरणाची लेखी तक्रर देऊन सुद्धा अद्याप काही कारवाई केली गेली नसल्याचं विरेश बोरकर माध्यमांशी बोलताना म्हणालेत.

वर्ष २०२२, सप्टेंबरमध्ये आमदार विरेश बोरकर यांनी स्वतः ही बेकायदेशीर घरं हटवण्यात यावीत म्हणून लेखी तक्रार दाखल केली होती, तरीही या तक्रारीची काहीच दाखल घेतली गेली नाही. "जर का आमदाराने तक्रार करून देखील बेकायदशीर वस्तीवर कारवाई होणार नसेल तर याचा अर्थ सरकारचा या वस्तीला पाठिंबा आहे असाच होतो असा आरोप बोरकर यांनी केलाय.

पुन्हा एकदा कलेक्टरांना या बेकायदेशीर घरांबद्दल कळवलं जाईल आणि रेव्होल्यूशनरी गोवन्स पक्षाकडून याची पुन्हा एकदा तक्रार केली जाणार आहे. स्थानिकांना मात्र वेळोवेळी त्रास दिला जातोय आणि या सगळ्यात अशी बेकायदेशीर घरं बांधून रहाणारी लोकं बिनघोर जगतायत असं विरेश यांचं म्हणणं आहे.

या भागात सध्या सरकारने वोट बँक तयार करून ठेवली आहे, आणि भाजप सरकारच बाहेरून आलेल्या लोकांचं समर्थन करतंय, पण यामध्ये स्थानिकांना होणार त्रास सरकार नजरेआड करतंय असा आरोपच बोरकरांनी केला. ६ मार्च रोजी उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार एव्हाना ही बांधकामं पाडायला पाहिजे होती. उच्च न्यायालयाने सुद्धा घालून दिलेल्या ८ प्रकारांमध्ये या वस्तीचा सुद्धा भाग येतो त्यामुळे आतातरी ही वस्ती पाडणं जरूरी असल्याचं आमदार विरेश बोरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

Sattari Fire: सत्तरीत आगीचे तांडव! भीषण आगीत घर भस्मसात, 15 लाखांचं नुकसान; आगीचं कारण अस्पष्ट Watch Video

Russian Tourist Murder: 2 रशियनांच्या हत्येनंतर प्रशासन 'ॲक्शन मोड'मध्ये; पर्यटक व्हिसावर क्लब-पबमध्ये काम करणाऱ्यांची होणार झाडाझडती

पालकांनो, मुलांच्या हाती फोन देताय? त्याआधी ऑन करा 'या' 5 सेटिंग्ज, अश्लील कंटेंटला बसेल कायमचा लगाम

VIDEO: 'मला वाटलं होतं खूप घाण असेल, पण...' भारतीय रेल्वेच्या प्रवासाने विदेशी तरुणी भारावली; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT