Sadanand Shet Tanavade Goa BJP President Dainik Gomantak
गोवा

आमदार गावकर 'श्रीलंकेत' पडले आजारी, प्रकृतीबाबत वाचा Health Update

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली माहिती

दैनिक गोमन्तक

सावर्डेचे आमदार गणेश गावकर हे गेल्या काही दिवसांपासून श्रीलंका येथे खाजगी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रकृती कारणास्तव तेथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. असे असले तरी सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी आपण गावकर यांच्याशी संपर्क केला असल्याचं म्हटलं आहे.

(BJP State President Sadanand Tanavade informed Ganesh Gaonkar's health is stable)

मिळालेल्या माहितीनुसार सावर्डेचे आमदार गणेश गावकर हे गेल्या काही दिवसांपासून श्रीलंका येथे खाजगी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव गावकर यांना श्रीलंका येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णाल्यात दाखल करण्याचे नेमके कारण समजले नसले तरी त्यांचे कुटुंबिय श्रीलंकेला रवाना होत असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी गावकर यांच्याशी चर्चा करत प्रकृतीबाबत विचारपूस केली आहे. यावेळी गावकर यांनी प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली.

गावकर यांचे कुटुंबिय आज श्रीलंकेला रवाना झाले आहेत. त्यांच्या प्रकृतीत आणखी थोडी सुधारणा झाल्यानंतर ते भारतात परतणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT