BJP sponsored farmers meet honors hardworking farmers in Salgaon Dainik Gomantak
गोवा

भाजप पुरस्कृत शेतकरी मेळाव्यात साळगावातील कष्टाळू शेतकऱ्यांचा सन्मान!

साळगावातील कष्टाळू शेतकऱ्यांचा सन्मान अनेक ग्रामथांच्या उपस्थितीत करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

पर्वरी: साळगाव पंचायत सभागृहात दिनांक 13 जून रोजी दुपारी तीन वाजता सुरू झालेल्या भारतीय जनता पक्ष पुरस्कृत शेतकरी मेळाव्यात माजी आमदार जयेश साळगावकर यांच्या हस्ते साळगावातील कष्टाळू शेतकऱ्यांचा सन्मान अनेक ग्रामथांच्या उपस्थितीत करण्यात आला.

(BJP sponsored farmers meet honors hardworking farmers in Salgaon)

मेळाव्याच्या सुरवातीला प्रमुख पाहुणे किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव गावकर व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलननाने शेतकरी मेळाव्याला प्रारंभ करण्यात आला. नेहा केरकर, अनुष्का घाड, अंजली केरकर,, रंजीता साळगावकर यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

शेतकऱ्यांसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून गोवा किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव मेग गावकर यांनी पिकांच्या शेती विषयी, नैसर्गिक शेती, जैविक कीड आणि रोग नियंत्रण इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले .

कृषी खात्याचे सहाय्यक कृषी अधिकारी राहुल जोंधळे यांनी सरकार मार्फत शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारया विविध योजना, फुलोत्पादन शेती, यांत्रिक शेती ,जलसिंचन, कृषी क्रेडिट कार्ड ,जीवन सुरक्षा ,फळप्रक्रिया इत्यादीची माहिती शेतकऱ्यांना दिली. श्री उदय प्रभुदेसाई यांनी खरीप हंगाम पूर्वतयारी विशेषत गावातील मुख्य खरीप पिके ,सोयाबीन, तुर व इतर पिकांचे अधिक उत्पादन कसे काढावे याविषयी माहिती दिली,

या कार्यक्रमात माजी आमदार साळगावकराबरोबर किसान मोर्चाचे अध्यक्ष वासुदेव मेग गावकर, सचिव उदय प्रभुदेसाई, प्रकाश नाईक, रमेश घाडी, सुवर्ण सिंग राणे व अनेक ग्रामस्थ हजर होते.

शेती लागवडीत कष्ट करून जास्तीत जास्त उत्पादन मिळवून यश प्राप्त केल्याबद्दल शेतकरी अंजली केरकर, संजय शिरोडकर, रेखा साळगावकर, सुनील परुळेकर ,सुभाष नाईक ,जयवंत राणे, श्रीपाद पालेकर, उदय मांद्रेकर ,अक्षय पुरखे, कायतान फर्नांडिस, रमेश इंसुलकर, नारायण गावकर, दशरथ कोरगावकर, गणपत गावकर यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रथम साळगाव भाजपा मंडळ अध्यक्ष रमेश घाडी यांनी आपले प्रास्ताविकपर विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक मयेकर यांनी केले तरदिगंबर कामतना भाजपमध्‍ये प्रवेश नाहीच : बाबू आजगावकर उपस्थितांचे आभार सरचिटणीस सुवर्ण सिंग राणे यांनी मानले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT