Mahadai Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadai Water Dispute: भाजपने शहांचे विधान चुकीचे सिद्ध करावे-पणजीकरांचा टोला

म्हादईच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadai Water Dispute म्हादई नदीच्या प्रश्नावर राज्य सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे कर्नाटकातील प्रसार माध्यमांनाही सांगण्याची हिंमत आमच्यात आहे, असे सांगणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी तत्पूर्वी अमित शहांचे विधान चुकीचे सिद्ध करण्याची हिंमत दाखवावी, असा उपरोधिक टोला अमरनाथ पणजीकर यांनी लगावला आहे.

तानावडे यांनी नुकतेच म्हटले होते, कर्नाटकातील प्रसार माध्यमांनी आम्हाला म्हादईच्या मुद्द्यावर प्रश्न विचारला तरी आम्ही या मुद्द्यावर सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, असे विधान करून, आमच्यात तशी हिंमत आहे. याबाबत काँग्रेस माध्यम विभागाचे अध्यक्ष पणजीकर यांनी आठवण करून दिली आहे.

खरे तर हे धाडस मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कर्नाटकात प्रचारात दाखवायला हवे होते. हे धाडस दाखवण्याऐवजी सावंत यांनी कन्नडमध्ये भाषण केले आणि म्हणाले की ‘स्वल्प स्वल्प कन्नड माथाडती’ (मी कन्नडमध्ये थोडे बोलू शकतो). आपल्या पक्षाला मते मिळवून देण्यासाठी त्यांनी हे केल्याचे ते म्हणाले.

अमित शहा गोव्यातील जाहीर सभेत बोलतील, तेव्हा प्रमोद सावंत आणि भाजपच्या इतर नेत्यांना आता या विषयावर स्पष्टीकरण देण्याची चांगली संधी मिळाली आहे.

कर्नाटकात प्रसारमाध्यमांसमोर बोलणे विसराच, भाजपच्या नेत्यांनी शहा यांच्यासमोर गोव्यातच हे विधान करून दाखवायची हिंमत दाखवावी आणि ते जे काही बोलले ते चूक होते, हे स्पष्ट करावे, असेही त्यांनी सूचविले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अभिनेता गौरव बक्शी पुन्हा अडचणीत, ओल्ड गोव्यात गुन्हा दाखल; मालमत्तेत घुसून धमकावल्याचा आरोप

Goa Tourism : जोडीदारासह 'निवांत' ठिकाणी जायचंय? गोवा ठरेल रोमँटिक गेटवे, वाचा परफेक्ट टूर गाईड

Viral Video: ''पडला तरी पठ्ठ्यानं बिअरचा कॅन सोडला नाही...'', बेदरकार तरुणांचा व्हिडिओ व्हायरल, नशेतील स्टंट पडला महागात; नेटकऱ्यांनीही घेतली मजा

Gold Theft Case: नामवंत ज्वेलरी शोरुममधून लंपास केलं 2.5 कोटींचं सोनं, चोरीच्या पैशांतून घेतली कोट्यवधींची मालमत्ता, लखनौच्या 'कोमल'चा पर्दाफाश!

प्रतीक्षा संपली! रोनाल्डो FC गोवाशी भिडणार; कधी अन् कुठे रंगणार सामना? जाणून घ्या सर्व माहिती

SCROLL FOR NEXT